सुरक्षा उपायांच्या नावाने बोंब

पालघर  जिल्ह्यतील बोईसर औद्योगिक क्षेत्र हे महाराष्ट्रातील सर्वात असुरक्षित औद्योगिक क्षेत्र आहे. लहानमोठय़ा अशा दीड हजार कंपन्या-कारखाने असलेल्या या औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा उपायांबद्दल प्रशासन, कारखाने व्यवस्थापन आणि कामगार यातील कुणीही गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच या ठिकाणी होणारे विविध अपघात, आगीच्या घटना यांमुळे दरवर्षी २५ कामगारांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

बोईसर एमआयडीसीत स्टील उद्योगापासून, औषध निर्मितीपर्यंत अनेक मोठय़ा कंपन्या आहेत. येथे तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात केली जातात. परंतु औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कंपन्यांमध्ये नेहमीच स्फोट आणि अपघात होत असतात.

महाराष्ट्रातीेल औद्योगिक कंपन्यांमध्ये स्फोटात सर्वाधिक बळी जाण्याचे प्रमाण बोईसर एमआयडीसीमध्ये होतात. बॉयलर आणि रिअ‍ॅक्टरचे स्फोट हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. याशिवाय हलगर्जीपणा, संशोधनाचे प्रयोग, दुय्यम यंत्रसामुग्री, अकुशल कामगार, सुरक्षा यंत्रणेचा अभाव या प्रमुख कारणांमुळे स्फोट होत असतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

अपघातांची कारणे

  • जवळपास प्रत्येक कंपन्यांमध्ये बॉयलर असतात. ते कोळसा, वीेज आणि डिझेलवर चालतात. बॉयलर हाताळण्यासाठी तज्ज्ञ बॉयलर ऑपरेटरचीे नेहमीे कमतरता असते. नवशिक्या किंवा इतर तंत्रज्ञाकडे बॉयलर हाताळण्याचे काम दिले जाते.
  • या पट्टय़ात १८ हून अधिक एमएएच युनिट्स म्हणजे अतिज्वलनशीेल पदार्थ हाताळणारे युनिट्स आहेत. येथीेल शेकडो कंपन्यांमध्ये ज्वलनशीेल पदार्थाचे तापमान वाढत असते. त्याला ‘रन अवे रिअ‍ॅक्शन’ म्हणतात. तीे हाताळता येत नसल्यानेही स्फोट होत असतात. अनेक कंपन्या लोखंड, स्टील निर्मितीसाठी भंगार ( स्क्रॅप ) वापरतात. परंतु त्यात पाणीे शिल्लक राहिले किंवा गळतीे झालीे की स्फोट होतो.
  • अनेक कंपन्या स्वस्तात उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कमीे कामगार आणि दुय्यम यंत्रणा वापरतात. त्यामुळे स्फोट होत असतात. संशोधनाचे प्रयोग केले जातात. पण त्यासाठी पुरेसी खबरदारी घेतलीे गेलेली नसते. त्यामुळेही स्फोट होत असतात.