मारहाणप्रकरणी ठाण्यात पीडित तरुणीसह कुटुंबीयांवर गुन्हा

ठाण्यातील विटावा येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला वारंवार फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्यास तरुणीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून धिंड काढली. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतरही शेरेबाजीचा प्रकार सुरूच राहिल्याने तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबावरही मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तरुणाची अवस्था लक्षात घेऊन गुन्हे दाखल केल्याचा दावा पोलिसांनी सांगितले.  कळव्यातील एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाइलवर वारंवार निनावी व्यक्ती फोन करून शिवीगाळ करीत होता. या प्रकरणामुळे पीडित मुलीने ९ जून रोजी कुटुंबीयांच्या मदतीने कोपरी पोलीस ठाण्यात तक्राप केली. या प्रकरणी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण दाखल झाल्यानंतरही फोन येण्याचे प्रकार सुरू असल्याने पीडित तरुणी आणि कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी या तरुणाला धडा शिकवण्यासाठी भेटण्यास बोलावून त्याला मारहाण करत धिंड काढली.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी

अहवाल वरिष्ठांना सादर करणार

रविवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक सुनीता काळबांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. तरुणीने ९ जून रोजी तक्रार केली. त्या संदर्भात तपास करून तरुणीला न्याय मिळवून देण्याचा पोलीस प्रयत्न करीत होते, असे काळबांडे यांनी सांगितले. या घटनेसंदर्भात अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.