News Flash

२६ गावांचा ‘बुलेट ट्रेन’ला विरोध

भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांना फिरू न देण्याचा ग्रामस्थांचा इशारा

भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांना फिरू न देण्याचा ग्रामस्थांचा इशारा

पालघर जिल्हय़ातील २६ गावांतून बुलेट ट्रेन जाणार असून त्यासाठी जमिनींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून एकाही शासकीय अधिकाऱ्याला परिसरात फिरू न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्य़ातून जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच मार्ग जाहीर केले. जिल्ह्य़ातील खोडावे, जलसार, मिठागर, विपाथन बुद्रुक, शिल्टे, मांडे, विराथन खुर्द, रामबाग, माकुणसार, रोठे, केळवे रोड, कमारे, वरखुंटी, नवली, मोरवली, वेवूर, अंबाडी, घोलवीरा, शेलवाडी, नंदोरे, पडघे, कल्लोळे, खानिवडे, वाळवे, शिरगांव, हनुमाननगर येथून बुलेट ट्रेन मार्ग जाणार आहे.

बोईसरमधील माण या ठिकाणी बुलेट ट्रेनचा थांबा असेल. या मार्गासाठी ५९ हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २६ गावांमधील ५९ हेक्टर जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्य़ातील ग्रामस्थांचा याला विरोध असून मनसेनेही यात उडी घेतली आहे. या मार्गासाठी भूसंपादन आणि जमिनींच्या सव्‍‌र्हेक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. याला मनसेने विरोध केला असून सर्व शक्तिनिशी बुलेट ट्रेनला विरोध करणार असल्याचे मनसेचे नेते कुंदन संख्ये यांनी सांगितले.

महामार्गालाही विरोध

बुलेट ट्रेनप्रमाणे मनसेने मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाला विरोध केला आहे. या राष्ट्रीय महामार्गासाठी डहाणू ते तलासरीपर्यंतच्या आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यासाठी डहाणू प्रांताधिकारी कार्यालयात जमीनधारकांसाठी ठेवलेली सुनावणीही मनसेने उधळून लावली. या राष्ट्रीय महामार्गासाठी पावणेचार हजार खातेदारांच्या जमिनी जाणार आहेत, तसेच ७० हजारांहून अधिक झाडांची कत्तल केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:28 am

Web Title: bullet train crisis in vasai
Next Stories
1 नऊ लाख मतदार अपात्र?
2 रुग्णालय हस्तांतर रखडणार
3 गर्दीच्या वेळेत ठाण्यात अवजड वाहनांना बंदी
Just Now!
X