24 January 2020

News Flash

वाडा-पिवळी बसला अपघात, ५० विद्यार्थी जखमी

ठाण्यातील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु

शहापुरातल्या पिवळी गावाकडे वाडा आगारातून जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. वाडा आगारातून ही बस पिवळी गावाच्या दिशेने निघाली होती. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास स्पीड ब्रेकरवर बस आदळली आणि रस्ता सोडून शेतात शिरली. या अपघातात ५० विद्यार्थी जखमी झाले. या बसमध्ये वाडा येथील. पां. जा. हायस्कूल आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते. ज्यापैकी ५० विद्यार्थी आहेत, अपघातात सगळेचजण जखमी झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून पुढील उपचारांसाठी या सगळ्यांना ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. बसमधल्या सगळ्याच प्रवाशांना इजा झाली आहे. सगळ्याच प्रवाशांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

First Published on August 13, 2019 1:05 pm

Web Title: bus accident at wada road 50 students injured scj 81
Next Stories
1 ‘मुंब्रा बाह्यवळण’ची दुर्दशा
2 कोपर पुलावर अवजड वाहतूक बंद
3 पुरामुळे प्राण्यांचा ‘पाणवठा’ तहानलेला
Just Now!
X