29 September 2020

News Flash

अन् ३५ प्रवाशांचा सुटकेचा नि:श्वास!

दोन किलोमीटपर्यंत पाठलागानंतर मद्यपी बसचालकास अटक

दोन किलोमीटपर्यंत पाठलागानंतर मद्यपी बसचालकास अटक
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदरजवळ मद्याच्या नशेत टीएमटी चालकाच्या प्रतापामुळे वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला प्राण गमावावे लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री याच मार्गावर मद्याच्या नशेत भरधाव बस चालविणारा राज्य परिवहन सेवेचा चालक संदीप जगताप याला ठाणे वाहतूक पोलिसांनी दोन किलोमीटपर्यंत पाठलाग करून पकडले. या बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. बसचालकामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. परंतु, वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली उपशाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी गुरुवारी सायंकाळी ब्रह्मांड नाका परिसरात वाहतुकीचे नियमन करीत होते. त्या वेळी राज्य परिवहन सेवेची बस ब्रह्मांड सिग्नल तोडून पुढे गेली. ही बस अर्नाळा येथून ठाण्याकडे येत होती. वाहतूक पोलिसांनी बसचालकाला थांबण्याचा इशारा केला, मात्र तो बस भरधाव घेऊन गेला. पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांनी जीपमधून त्यांचा पाठलाग सुरू केला. दोन किमी अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ त्यांनी ही बस थांबविली. या बसचालक संदीप जगताप याला ताब्यात घेऊन त्याची मद्य तपासणी केली. त्यामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. हे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणापेक्षा सहा पट जास्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक संदीप जगताप याला अटक करून गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:14 am

Web Title: bus driver arrested for drunk driving in thane
Next Stories
1 डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या दहावर, मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
2 रासायनिक विभाग सुरक्षित ठिकाणी हलविणार
3 निर्णयावरील निष्ठा महत्त्वाची !
Just Now!
X