माथेरानच्या सिला पाँईट जवळ ८०० फूट खोल दरीतून रविवारी संध्याकाळी माथेरान पोलीस आणि बचाव पथकाने एक मृतदेह बाहेर काढला. ठाणे माजीवाडा येथे रहाणारे रहिवाशी परेश मिरानी (४८) गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता होते. पोलिसांना त्यांचे आधार कार्ड, वाहन परवाना आणि मोबाइल फोन घटनास्थळावरुन मिळाला. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी सात तास लागले. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. आदिवासींनी पोलिसांना मृतदेहाबद्दल माहिती दिली. पोलिसांनी सहयाद्री मित्र मंडळाच्या ट्रेकर्सची मदत घेतली. ट्रेकर्सनी दुपारी एकच्या सुमारास दरीत उतरण्यास सुरुवात केली. संध्याकाळी ७.३० वाजता मृतदेह घेऊन ते बाहेर आले.

मृतदेह खूप खराब अवस्थेमध्ये आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. पेरश मिरानी यांच्या मुलाने भिवंडीच्या नापोली पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.