भोज धरणातून रोज सहा दशलक्ष लिटर पाणी घेण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील ३० टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला. आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत भोज धरणातून रोज सहा दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीमार्फत उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्याच्या अंमलबजावणीत  तांत्रिक अडचणी आल्या होत्या.