परदेशी श्वानांच्या लोकप्रियतेमुळे काही श्वान प्रजाती श्वानप्रेमींमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. या लोकप्रिय श्वानांच्या व्यतिरिक्त आदर्श असणाऱ्या काही श्वानांना पाहावी तशी फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. या श्वानांचा इतिहास जुना असला तरी जगभरात काही श्वान लोकप्रिय झालेले नाहीत. याच श्वानांपैकी आदर्श मानले जाणारे केन कोरसो सध्या जगभरात श्वानप्रेमींकडे पाहायला मिळत आहेत. रोमन साम्राज्यापासून या श्वानांचा इतिहास सापडतो. रोमन युद्धात केन कोर्सो हे श्वान वापरले जात होते. इटलीमध्ये या श्वानांना प्रचंड लोकप्रियता आहे. इटालियन मॅस्टिफ असेदेखील या श्वानांना संबोधले जाते. आजही इटलीमध्ये राखण करण्यासाठी या श्वानांचा वापर अधिकाधिक होताना दिसत आहे. वेगवेगळ्या रंगांत हे श्वान आढळत असल्याने श्वानप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. बहुतेक काळ्या रंगातील श्वानांना विशेष पसंती असते. अत्यंत हुशार आणि निर्भीड स्वभावाचे श्वान असल्यामुळे या श्वानांची कामातील उपयुक्तता मोठी आहे. त्यासाठी या श्वानांना वर्किंग डॉग म्हटले जाते. कोणतेही काम शिताफीने करण्याचे प्रचंड सामथ्र्य या श्वानांमध्ये आहे. कळपाचे रक्षण करणे, शिकार करणे, राखण करणे यांसारख्या कामात केन कोरसो श्वान आपली जबाबदारी उत्तमरीत्या बजावतात.

आव्हानाला प्रत्युत्तर

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

या श्वानांचे पालन करताना श्वानपालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कोणतेही काम स्वीकारण्याची आणि ते काम पूर्णत्वास नेण्याची या श्वानांची सवय असल्याने सहसा या श्वानांना आव्हाने देऊ नयेत. कोणत्याही आव्हानाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी केन कोरसो श्वान कायम तत्पर असतात. हे आव्हान पूर्णत्वास नेताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नसल्याने केन कोरसो जिवावर बेतेल अशी कृती करत असल्याने श्वानपालकांना सावध राहावे लागते. सतत या श्वानांच्या सामर्थ्यांची परीक्षा घेत राहिल्यास या श्वानांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. नेतृत्व करण्याची या श्वानांची क्षमता विशेष उल्लेखनीय आहे. कोणत्याही कामात नेतृत्व सिद्ध करत सहभागी होण्याचे या श्वानांचे कसब कौतुकास्पद आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या श्वानांचे कौशल्य वाढवण्यास मदत होते. श्वानपालकांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची ओळख या श्वानांना करून द्यावी लागते. राखण करताना कसलीही चाहूल असल्याची शंका आल्यास शंकेचे निरसन झाल्याशिवाय हे श्वान शांत बसत नाहीत. ते मालकाला खुणावत राहतात.

पोषक आहार, उत्तम व्यायाम

केन कोरसो श्वानांचा आहार इतर श्वानांच्या तुलनेत जास्त आहे. मजबूत शरीरयष्टी आणि कामगिरीसाठी वापरण्यात येत असल्याने या श्वानांना उत्तम दर्जाचा पोषक आहार आणि व्यायाम देणे गरजेचे असते. दोन श्वानांचा आहार केन कोरसो श्वानांसाठी एका दिवशी लागतो. किलोभर मांसाहार दिवसभरात हे श्वान फस्त करू शकतात.  या श्वानांचे पालन खर्चीकदेखील आहे. व्यायामाच्या माध्यमातून या श्वानांना शारीरिक आणि मानसिकरीत्या उत्तम ठेवावे लागते.

रूपच भीतिदायक

केन कोरसो श्वान दिसायलाच अत्यंत भीतिदायक असल्याने संशयास्पद असलेली कोणतीही व्यक्ती सहसा या श्वानांना आव्हान देत नाही. राखण करण्याचे उत्तम कसब असल्यामुळे आणि भीतिदायक रूपामुळे मोठय़ा बंगल्याचे, शेतशिवारांचे रक्षण करण्यासाठी केन कोरसो श्वानांचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होतो. मजबूत शरीरयष्टी आणि निर्भीड स्वभाव यामुळे कोणत्याही व्यक्तीमध्ये या श्वानांविषयी दहशत असते.