News Flash

लैंगिक अत्याचारप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

या प्रकाराचा ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाकडून निषेध करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरने २७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. योगेश गोडगे असे त्यांचे नाव असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणी ही योगेश गोडगे यांच्या परिचयाची आहे. योगेश यांनी ज्युपिटर रुग्णालय तसेच इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस योगेश यांचा शोध घेत आहेत. या प्रकाराचा ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाकडून निषेध करण्यात आला आहे.

रुग्णालय आवारामध्ये अशी घटना घडणे अशक्य असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. असे असले तरी महिला रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची सुरक्षा महत्त्वाची असून पोलीस आणि न्यायव्यवस्थेला आमचे पूर्ण सहकार्य राहील, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:13 am

Web Title: case filed against doctor for sexual assault zws 70
Next Stories
1 बदलापूरमध्ये कत्तलखान्यावर कारवाई
2 एसटी थांब्यांची दुर्दशा
3 नाताळनिमित्त चर्चचा आध्यात्मिक तयारीवर भर
Just Now!
X