13 July 2020

News Flash

ठाणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

ठाणे शहरामध्ये प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे बसविले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पालिकेच्या ढिलाईवर सर्वसाधारण सभेत हल्लाबोल

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने गाजावाजा करत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. नौपाडा पोलिसांनी एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मिळविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतर ही बाब उघड झाली.

ठाणे शहरामध्ये प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे बसविले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेऱ्यांमुळे सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, या उद्देशातून महापालिकेने ही योजना राबविली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शहरभर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिकेची सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड केले. नौपाडा पोलिसांनी एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मिळविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे महिनाभरापूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्या वेळेस चरई, हरिनिवास सर्कल, ब्राह्मण सोसायटी, दगडी शाळा सर्कल, चरई, गोखले रोड, अहिल्याबाई होळकर मैदान, मुस चौक, प्रभाग क्रमांक १९, २०, २१ या ठिकाणी कॅमेरे बंद असल्याचे समोर आले, अशी माहिती पेंडसे यांनी सभागृहात दिली. महिनाभरापूर्वी ही बाब उघडकीस आली असतानाही त्यावर कोणतीच कारवाई पालिकेने केलेली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बसविलेल्या कॅमेऱ्यांचा काय फायदा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहराची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांची असतानाही पालिकेने हे काम आपल्या खांद्यावर घेणे उचित नव्हते. पोलिसांनाच ही जबाबदारी दिली असती तर कॅमेऱ्यांसंबंधीच्या आरोपांना पालिकेला सामोरे जावे लागले नसते, असा मुद्दा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत माहिती घेण्यात येईल. येत्या १५ दिवसांत यासंबंधीचा अहवाल सादर करून पुढील कारवाई निश्चितपणे करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सभागृहात दिली.

वायफाय योजना वादात

ठाणे महापालिकेमार्फत मोफत वायफाय सुविधा पुरविण्यात येत असून ही सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेच्या माध्यमातून शहरात वायफायचे जाळे विणले आहे. त्या माध्यमातून तो इतरांना सेवा पुरवून लाखो रुपये कमवीत असल्याचा संशय भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 1:14 am

Web Title: cctv cameras closed thane city akp 94
Next Stories
1 रेल्वे रुळांखालून चोरीच्या जलवाहिन्या
2 एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव बासनात?
3 देशातील बेरोजगारीचा प्रश्न साहित्यातून उमटावा!
Just Now!
X