News Flash

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव

महाविद्यालयात आठ दिवस दररोज वेगवेगळ्या स्पर्धाची रेलचेल पाहायला मिळाली.

अंबरनाथ येथील एस.आय.सी.ई.एस. महाविद्यालयाचा कलाउत्सव महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्साहात नुकताच महाविद्यालयात पार पडला. कलाउत्सव महोत्सवाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात आठ दिवस दररोज वेगवेगळ्या स्पर्धाची रेलचेल पाहायला मिळाली. सर्व स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांसाठी पारितोषिक समारंभ महाविद्यालयात आयोजित करून कलाउत्सव महोत्सवाची सांगता करण्यात आली. पारितोषिक वितरण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष के.एम.एस नायर  तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या  प्रभारी प्राचार्या रेखा नायर व वरिष्ठ महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षल बच्छाव उपस्थित होते.

समारंभाचे आयोजन प्राध्यापिका राखी गुलाटी यांनी केले. पारितोषिक वितरणाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले कलागुण नृत्य, पथनाटय़ आणि गायन स्पर्धेतून सादर केले. विद्यार्थ्यांनी तरुणांची जागृती या विषयावर पथनाटय़ सादर करत भारतातील समस्या, त्या सोडवण्यासाठी उपाय आणि त्यासाठी तरुणांचा सहभाग या विषयांवर भाष्य केले. विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. कलाउत्सव महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मिस्टर आणि मिस स्पर्धेमध्ये मिस्टर एस.आय.सी.ई.एस. किताब अथर्व प्रभुणे तसेच मिस एस.आय.सी.ई.एस. चा किताब गायत्रीअय्यर विद्यार्थ्यांनी मिळवला. प्रा. राखी गुलाटी यांच्या मार्गदर्शनाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पॉट लंच स्पर्धा

महोत्सवात आयोजित केलेली पॉट लंच स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेला पदार्थ महाविद्यालयात आणला होता. प्राध्यापकांनी केलेल्या परिक्षणावरून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल

प्रतिनिधी ठाणे

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष काम कसे केले जाते याचा प्रात्यक्षिक अनुभव घेता यावा यासाठी एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल डहाणू येथील रिलायन्स थर्मल वीज प्रकल्प येथे आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राध्यापक सुनील शहा यांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थापन, बँकिंग अभ्यासक्रमाच्या ५५ विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

डहाणू येथील रिलायन्स थर्मल प्रकल्प येथे फळे आणि भाज्या तयार केल्या जातात. तसेच टाकाऊपासून टिकाऊ अशा अनेक वस्तू या प्रकल्पात बनवल्या जातात. फळे आणि भाज्या बनवण्याची प्रक्रिया चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली तसेच काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामुळे अभ्यासासोबत प्रत्यक्ष काम कसे चालते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या अभ्यास सहलीच्या निमित्ताने मिळाले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले काही प्रेझेंटेशन्स तेथील अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली. रिलायन्स थर्मल प्रकल्पाचे मानव

संसाधन व्यवस्थापक रोशन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बांदोडकर महाविद्यालयात ‘ट्रिब्युट टू लिजेन्ड्स’

ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर

दरवर्षी साजरा होणाऱ्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या ‘आकांक्षा’ महोत्सवात यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २२ आणि २३ डिसेंबर रोजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहभागाने हा महोत्सव उत्साहात पार पडला. कला, विज्ञान, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांना मानाचा मुजरा म्हणून यंदाच्या वर्षी  ‘ट्रिबुट टू लिजेन्ड्स’ अशी महोत्सवाची संकल्पना होती. या संकल्पनेवर आधारित डॉ. अब्दुल कलाम, नेल्सन मंडेला, सुरेश भट, निळू  फुले, सचिन तेंडूलकर, सरोजिनी नायडू, बाळासाहेब ठाकरे, कमल हसन, लता मंगेशकर, नील आर्मस्ट्राँग, आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांची छायाचित्रे महाविद्यालयाच्या आवारात लावण्यात आली होती.

या महोत्सवाच्या अंतर्गत महाविद्यालयात फाईन आर्ट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी, मेहंदी, छायाचित्र, नवरी नटली अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सलाड मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घरगुती वापरात असणाऱ्या भाज्यांपासून विविध प्राणी, शोभेच्या वस्तू तयार केल्या होत्या. पर्सनॅलिटी हंट स्पर्धेत कौशल्य चाचणी, प्रश्नमंजूषा, कॅट वॉक या फेऱ्या घेण्यात आल्या. या स्पर्धेत कीर्ती बाह्मणे या विद्यार्थिनीची मिस बांदोडकर आणि हमिदुल्ला खान या विद्यार्थ्यांची मिस्टर बांदोडकर म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण नाटय़ दिग्दर्शक अजिंक्य ननावरे व अभिनेत्री काजोल शर्मा यांनी केले. अभिनयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅिक्टगची फॅक्टरी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा आकांक्षा महोत्सव ट्रिब्युट टू लिजेन्ड्स या संकल्पनेवर आधारित असल्याने फॅशन शोमध्ये आदिमानवापासून सध्याच्या तरुणांमध्ये बदलत जाणारी वेशभूषा पाहायला मिळाली.  विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रात उच्च कामगिरी केलेल्या मान्यवरांची आजच्या तरुणाईला ओळख व्हावी याच माध्यमातून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास व्हावा या अनुषंगाने यंदाच्या वर्षी आकांक्षा महोत्सव ‘ट्रिब्युट टू लिजेन्ड्स’ या संकल्पनेवर आधारित होता, असे महोत्सवाचे समन्वयक प्रा. प्रकाश माळी यांनी सांगितले.

मंजुनाथ महाविद्यालयाची विशेष नाताळ भेट

प्रतिनिधी, ठाणे

दुसऱ्यांसाठी काही करायची तळमळ असली तर आपोआप चांगल्या गोष्टी घडत जातात व चांगल्या गोष्टीना लागणारे हातही वाढत जातात. मंजूनाथ कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी अशाच प्रकारचे विविध समाजोपयोगी कार्य करत आहेत. नाताळ सणाचे औचित्य साधुन मंजुनाथ कॉलेजचा विद्यार्थ्यांनी ‘एक नाताळ तुमच्यासोबत’ हा उपक्रम राबविला.

महाविद्यालयाच्या आसपासच्या परिसरातील तळागाळातील मुलांनाही नाताळचा आनंद घेता यावा व आजवर केवळ चित्रांमध्ये पाहिलेला सांताक्लॉसची भेटता यावे त्यासाठी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते.  यामध्य येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीत हातभार लागावा यासाठी पेन, पेन्सील, पट्टी,व’ाा आदीं वस्तूंचे वाटप राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच जुने कपडे गोळा करण्याची विशेष मोहिमं एन.एस.एस च्या  विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आली होती या कपडय़ांचीही वाटप या निमित्ताने करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंजुनाथ कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुष्कर देशपांडे  यांसोबत २० हून अधिक स्वयंसेवकांनी  यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्यांना मदतीसाठी आशाऐ ग्रुप चे सुदीप पात्रा, संकेत कुबल, शेफाली मिश्र, रोहित नायर, विक्रांत दिक्षित यांनी कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2015 2:43 am

Web Title: celebration of college event in thane
टॅग : Celebration,College,Thane
Next Stories
1 आशीष, सानिका, उत्कर्ष, ऐश्वर्या ‘नवरंग’
2 महेश पाटील याच्यासह १६ जणांची जामिनावर सुटका
3 औद्योगिक आणि कामगार अदालतमध्ये ९२ प्रकरणे निकाली
Just Now!
X