News Flash

केंद्रीय अर्थसंकल्प जाणून घ्या सहजपणे!

कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

ठाण्यात उद्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम; अर्थसंकल्पाच्या सर्वसामान्यांवर होणाऱ्या परिणामांवर मंथन

ठाणे : देशाचा अर्थप्रपंच आणि जनसामान्यांचा संसार नेटका करू पाहणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाला निश्चितच अनेक पैलू आणि कंगोरे आहेत. त्यांचे महत्त्व आणि नेमका अर्थ उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ यंदाही पार पाडणार आहे. शनिवारी, १ फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. त्याच दिवशी संध्याकाळी ठाण्यात आयोजित ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रमातून सर्वसामान्यांना अर्थसंकल्प सहज व सोपेपणाने जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

अपना सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रम १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.०० वाजता टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (प.) येथे योजण्यात आला आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि प्रसिद्ध कर-सल्लागार दीपक टिकेकर हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.

मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत असल्याचे जनसामान्यांना आणि उद्योगक्षेत्रालाही सांगण्याची यंदाचा अर्थसंकल्प ही एक मोठी संधी आहे. या दृष्टीने या संकल्पाचा सामान्य करदाता, पगारदार वर्ग खरेच किती लाभार्थी ठरला आणि अर्थसंकल्पातून त्याच्या जीवनमानावर कोणता परिणाम संभवेल. कर तरतुदीतील फेरबदल हे लोकांहाती खर्च करण्याची क्षमता वाढविणाऱ्या असतील काय? तसेच त्या परिणामी गुंतवणूक आणि बचतीला चालना देऊन सर्वसामान्यांच्या अर्थसिद्धीच्या दिशेने प्रयत्न झाला आहे काय, याचा दोन्ही वक्ते या निमित्ताने ऊहापोह करतील.

कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

वक्ते

दीपक टिकेकर-(कर-सल्लागार)

गिरीश कुबेर-(संपादक, लोकसत्ता)

कधी?

शनिवार, १ फेब्रुवारी २०२०, सायं.

कुठे?

टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:11 am

Web Title: central budget loksatta in thane akp 94
Next Stories
1 कळवा-ऐरोली उन्नत मार्ग सुकर!
2 ‘शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने मासुंदा तलावकाठी मैफल
3 पहिल्या दिवशी स्वस्तात गारेगार प्रवास
Just Now!
X