News Flash

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ‘अभंग बँड’, ‘जीवनगाणी’

खेळ खेळून ‘गिफ्ट कूपन’ जिंकण्याची संधी

खेळ खेळून ‘गिफ्ट कूपन’ जिंकण्याची संधी

ठाणे : रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ गेल्या आठवडय़ापासून उत्साहात सुरू आहे. या कार्यक्रमात खरेदी सोबत बक्षिसे जिंकण्याच्या संधी बरोबरच आता सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद लुटता येणार आहे. मासुंदा तलावाकाठी शनिवारी ठाण्यातील तरुणांच्या ‘अभंग बँड’चा आणि रविवारी ‘जीवनगाणी’ प्रस्तुत नृत्य-गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

सहलीपासून गृहोपयोगी उपकरणांपर्यंत विविध बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ग्राहक शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये  ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील ग्राहक सहभागी होत आहेत. महोत्सवात सहभागी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यंदा या फेस्टिव्हलचे सहावे पर्व असून ग्राहकांचा उत्सूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरूअसणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. या भाग्यवान विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यासारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे. या फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज देण्यात येणार आहेत.

शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ठाणेकरांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासोबतच गिफ्ट कुपन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या गिफ्ट कुपनद्वारे तुम्ही शॉपिंग  करता येणार आहे.

कधी ?

शनिवार, २ फेब्रुवारी आणि रविवार, ३ फेब्रुवारी

वेळ :  सायंकाळी ६.३० ते ९

कुठे ?

चिंतामणी चौक, तलावपाळी, ठाणे (प)

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे.  वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डिजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजीटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, क्रिष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा, कुलस्वामिनी साडी हे प्लॅटीनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अँड सलोन आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रम्हविद्या हे हिलींग पार्टनर आहेत. त्याचबरोबर ईशा टुर्स हे ट्रव्हल पार्टनर आहेत.

सहभागास इच्छुक दुकानदारांनी संपर्क

कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१

गोविंद भोसले- ९८१९८१४२५३

अतुल जोशी- ९८२१४७५९१९

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे जिंकता येतील.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून एक कूपन दिले जाईल.

* ते  कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेले कूपन फेटाळले जाईल.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून रोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’ मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:04 am

Web Title: chance to win gift coupon in loksatta thane shopping festival
Next Stories
1 विकास आराखडा करण्यास असमर्थ
2 नवऱ्याच्या मनात संशय, कार्यालयात घुसून केली बायकोची हत्या
3 मुलाच्या शाळेत डान्स केला म्हणून पत्नीला बॅटने मारहाण
Just Now!
X