ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येऊ लागले आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार या शाळांमध्ये तासिका शिक्षक घेण्यात येत असून त्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची निवड करण्यात येते. या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहावीच्या निकालामध्ये वाढ झाल्याने हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधी प्रशासनाने तयार केलेल्या सविस्तर प्रस्तावास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे खासगी शिकवणीचा खर्च न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

सर्व शिक्षा अधिकार कायद्यानुसार एका वर्गामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ३० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ३५ निश्चित करण्यात आली आहे. तसेच इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमाल पटसंख्या ४५ असणे आवश्यक आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या दहा माध्यमिक शाळा असून त्यामध्ये २०१५ विद्यार्थी शिकत आहेत. तसेच प्राथमिक शाळेतील तुकडीमध्ये सुमारे ६० विद्यार्थी आहेत तर माध्यमिक शाळेतील तुकडीत सुमारे ७० विद्यार्थी आहेत. सर्व शिक्षा अधिकार नियमानुसार ही पटसंख्या जास्त आहे.
परिणामी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालवत आहे. ही बाब दोन वर्षांपूर्वी निदर्शनास येताच प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले असून त्यातून शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षकांना तासिका तत्त्वावर घेऊन त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत दहावीच्या निकालामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने हा उपक्रम यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.

’शिक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार, तासिका शिक्षकांना प्रति तासाचे ६० रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.
’दिवसाला पाच तास याप्रमाणे महिन्याकाठी शिक्षकांना ७८०० इतके शिकवणी शुल्क द्यावे लागणार आहे.
’या उपक्रमासाठी १७ शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याने त्याकरिता महिन्याकाठी एक लाख ३२ हजार सहाशे रुपये खर्च येणार आहे.
’पुढील सहा महिन्यांकरिता हे शिक्षक घेण्यात येणार असून त्यासाठी सात लाख ९५ हजार सहाशे रुपये खर्च अपेक्षित आहे.

वर्ष टक्केवारी
२०१२-१३ ५६.२२ %
२०१३-१४ ७१.८ %
२०१४-१५ ८१.३ %

वर्ष टक्केवारी
२०१२-१३ ५६.२२ %
२०१३-१४ ७१.८ %
२०१४-१५ ८१.३ %