मोर्चेकऱ्यांची गर्दी पाहून ठाण्यातील वाहतुकीत बदल

ठाणे, मुंब्रा तसेच भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहतूकबाबतचा विचार मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, असे केल्यास उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदराहून भिवंडीच्या गोदामांच्या दिशेने होणाऱ्या मालवाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन यासंबंधी आस्ते कदम टाकण्याचे वाहतूक विभागाने ठरविले आहे. बुधवारी मोर्चानिमित्ताने निर्माण होणारे एकंदर वातावरण पाहूनच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागातील सूत्रांनी दिली.

Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
heavy goods vehicles ban on Ghodbunder road for six month
घोडबंदरकरांची अवजड वाहतूकीच्या कोंडीतून सुटका? पुल कामासाठी अतिअवजड मालवाहू वाहनांना बंदी

गेल्या काही वर्षांत भिवंडी शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामांमध्ये विविध कंपन्यांचा माल साठवून ठेवण्यात येतो. त्यासाठी उरणच्या जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच या बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहनेही मुंब्रा, ठाणे, घोडबंदरमार्गे वाहतूक करतात. या मार्गावर अवजड वाहतुकीचा भार वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चामुळे ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील अवजड वाहतूक काही काळासाठी थांबविता येईल का, यासंबंधी पोलीस दलात गेल्या काही दिवसांपासून खल सुरू होता. मात्र, अवजड वाहतूक बंद ठेवली तर त्याचा फटका विविध व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होत असते. कोटय़वधी रुपयांचा माल साठवणुकीसाठी या गोदामांच्या दिशेने रवाना होतो. मोर्चानिमित्त अवजड वाहतूक बंद केल्यास ही वाहने बंदरातच अडकून पडण्याची भीती आहे. त्यामुळे याविषयी व्यावसायिकांचा एकंदर सूर लक्षात घेता ठाणे पोलिसांनी तात्काळ अवजड वाहतूक बंद करायची नाही असे ठरविले आहे. बुधवारी मोर्चेकरांची गर्दी पाहून त्याच दिवशी अवजड वाहतूक बंदीबाबत निर्णय घेण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता, मराठा क्रांती मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक डाव्या बाजूने सुरू ठेवणार आहे. यामुळे अन्य मार्गिकांवरून वाहतूक सुरळीतपणे सुरू राहू शकेल. तसेच मोर्चेकरांची गर्दी पाहूनच अवजड वाहतूक बंद ठेवायची की नाही, याचा निर्णय बुधवारी होईल, असे सांगितले.

उपायांची जंत्री..

रस्त्यामध्ये एखादे वाहन बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विविध मार्गावर २३ क्रेन्स उभे ठेवणार आहेत. वाहतूक शाखेचे ५४ अधिकारी आणि ६०० कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. मंगळवार सायंकाळपासून शहरात वाहतूक पोलीस तैनात करणार असून ते बुधवारी रात्री उशिरापर्यंत वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नऊ तासांच्या शिफ्टचे नियोजन केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.