News Flash

अखेर शिवरायांच्या पुतळ्याला स्थायीची मंजुरी

घोडबंदर परिसरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या नावावर स्थायी समिती कडून फेटाळण्यात आला होता.

चहुबाजूने समितीच्या निर्णयाचा विरोध झाल्याने तातडीने स्थायी समितीची बैठक घेऊन पुतळ्याच्या फेर प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: घोडबंदर परिसरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या नावावर स्थायी समिती कडून फेटाळण्यात आला होता. मात्र, सर्व चहुबाजूने समितीच्या निर्णयाचा विरोध झाल्याने तातडीने स्थायी समितीची बैठक घेऊन पुतळ्याच्या फेर प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

मीरा- भाईंदर महानगरपालिकेमार्फत घोडबंदर परिसरात शिवसुष्टी उभारण्याचे काम होती घेण्यात आले आहे. त्याच सह या भागातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट उंचीचा कांस्य धातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उभारणीकरिता सुमारे २ कोटी ९५ लाखाचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. या करीता तीन वेळा निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून ‘गारनेट इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने सत्ताधारी भाजप पक्षाने तिन्ही वेळा निविदेला मान्यता दिले नसल्याचे आरोप शिवसेनेने केले होते. यावर चहू बाजूने टीका होत असल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी फेरप्रस्ताव सादर करण्यात आला असता भाजपने बहुमताने मंजूर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:20 am

Web Title: chatrapati shivaji maharaj statue dd 70
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यात पाणीपुरवठा खंडित
2 शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र
3 औषध दुकानांत अमली पदार्थ विक्री?
Just Now!
X