16 October 2019

News Flash

‘देशातील सर्वच संस्था सरकारने मोडीत काढल्या’

ठाणे येथील गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर राष्ट्रवादी पक्षाने शनिवारी सायंकाळी निर्धार परिवर्तन जाहीर सभा घेतली.

छगन भुजबळ (संग्रहित छायाचित्र)

देवाच्या जाती काढण्याचे काम सुरु असून माणसांना सोडले नाही पण आता देवाला तरी सोडा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथील सभेत भाजपवर केली.

ठाणे येथील गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर राष्ट्रवादी पक्षाने शनिवारी सायंकाळी निर्धार परिवर्तन जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य शासनावर टीका केली.  देशातील सर्वच संस्था मोदी सरकारने संपवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्रात आणि राज्यातील मंत्रीमंडळात भाजपने घेतलेल्या निर्णयाला शिवसेना साथ देते आणि त्यामुळेच त्यांच्या पापात शिवसेनेचाही तितकाच वाटा आहे असा आरोप त्यांनी केला.

First Published on January 13, 2019 12:46 am

Web Title: chhagan bhujbal on bjp