05 June 2020

News Flash

Coronavirus : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

बदलापुरात चिकन विक्रेत्यावर गुन्हा दाखल

बदलापुरात चिकन विक्रेत्यावर गुन्हा दाखल

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचे परिधान करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी दिला असून त्यानुसार ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांमध्ये पोलिसांनी गुरुवारपासून विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये बदलापूरमधील एका चिकन विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारचा हा आयुक्तालय क्षेत्रातील पहिला गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरीही अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरत आहेत. खरेदीसाठी येणारे हे नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्यामुळे करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात कामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून यासंबंधीचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आहेत. या आदेशानुसार कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मास्क घालावे, असे आदेशात म्हटले आहे. औषधालयातील मास्क तसेच घरात तयार करता येणारे आणि धुण्यायोग्य मास्क नागरिक वापरू शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर पूर्वेकडील स्थानक परिसरात बुधवारी रात्री एका चिकन विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:57 am

Web Title: chicken vendor sued in badlapur for not wearing mask zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 coronavirus : ठाण्यात दोन जण करोनामुक्त
2 टाळेबंदीच्या काळात २४ लाखांचा मद्यसाठा जप्त
3 ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहा
Just Now!
X