28 February 2021

News Flash

अल्पवयीन मुलांना विवस्त्र करुन मारहाण, अंबरनाथमधील घटना

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

(प्रतिकात्मक छायाचित्र)

क्षुल्लक कारणांवरुन तीन अल्पवयीन मुलांना विवस्तर करुन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरानथ पश्चिमेतील चिंचपाडा भागात उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबू उर्फ खोपडी अशप्पा गुंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

चिंचपाडा भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी या मुलांना मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी हा प्रकार घडला. एका मुलाला मोकळ्या मैदानात मारहाण करन जाब विचारताना आरोपी दिसत आहे. या मुलाला विवस्त्र करुन काठीने आणि ठोश्या बुक्क्याने मारहाण केली गेली. आरोपी मारहाण करत असताना त्याचे इतर साथीदार या घटनेचा व्हिडीओ तयार करत होते.

क्षुल्लक कारणांवरुन ही मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 12:58 pm

Web Title: chinchpada badlapur crime one arrest nck 90
Next Stories
1 ..तर ठाण्यात कठोर निर्बंध
2 नियम न पाळल्यास टाळेबंदी!
3 काटकसरीतही नव्या वाहनांचा सोस
Just Now!
X