22 September 2020

News Flash

इन फोकस : डोलारा सांभाळण्यासाठीची ‘सर्कस’

शेकडो उपग्रह वाहिन्यांनी टीव्ही माध्यमाची ताकद हजारो पटींनी वाढवल्याने मनोरंजनाची परिभाषाच बदलली

सर्कस कल्याणच्या बैल बाजारात आली आहे.

thlogo06शेकडो उपग्रह वाहिन्यांनी टीव्ही माध्यमाची ताकद हजारो पटींनी वाढवल्याने मनोरंजनाची परिभाषाच बदलली. माणसांना या छोटय़ा पडद्याने घरातच कोंडून ठेवले. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने लोकांची मने रिझविण्याच्या व्यवस्थेला तडा गेला. सर्कस त्यापैकी एक. सुमारे वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या शहरात सर्कस आली की त्याच्या जाहिराती करणाऱ्या दवंडय़ा पिटवल्या जात. सर्कशीमध्ये हत्ती, वाघ, सिंह यांच्यापासून अनेक प्रकारचे पाळीव प्राणी-पक्षी असत. या सर्वाना पाहायला मग कोण गर्दी होत असे. प्राण्यांशी खेळणाऱ्या रिंगमास्टरपासून उंच झोक्यांवरून लीलया कवायती करणाऱ्या कसरतपटूंपर्यंत साऱ्यांचेच फार अप्रूप वाटे. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि अशा चित्तथरारक कसरती आणि साहसी खेळ घरबसल्या टीव्हीवरच दिसू लागले. त्यातच कायद्याने सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी आणली आणि मनोरंजनाचा हा डोलाराच ढासळला. मात्र काही कंपन्या/ मालक आजही नेटाने सर्कस चालवीत आहेत. अशीच एक सर्कस सध्या कल्याणच्या बैल बाजारात आली आहे. मानवी कसरती आणि विनोदाच्या जोरावर कसाबसा सर्कशीचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न व्यवस्थापक करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2015 12:12 am

Web Title: circus in thane
टॅग Thane
Next Stories
1 कल्याण/डोंबिवली शहरबात : फेरीवालामुक्त कल्याणचा ध्यास
2 आधुनिक तंत्रज्ञानासोबत उत्कृष्ट ग्रंथसंपदा
3 ठाणे पोलिसांची वांगणीवर ‘नजर’
Just Now!
X