News Flash

आमच्या स्वप्नातील कल्याण : ‘सुंदर नगरी’चे स्वप्न साकार करूया!

कल्याण-डोंबिवली शहरांचा केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश झाला आहे.

अजयकुमार जोगी, शिक्षक
tv10कल्याण-डोंबिवली शहरांचा केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश झाला आहे. या शहराचे सुंदर नगरीत रूपांतर करताना ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपणारे शहर, क्रीडानगरी, शैक्षणिक, दळणवळणाचे केंद्र, पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे म्हणून पालिका प्रशासनाबरोबर नागरिकांनीही जबाबदारी उचलली पाहिजे.
कल्याण रेल्वे स्थानकातून शहराच्या आतील भागात जाण्यास सुरुवात केली की, सर्वत्र दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य असते. या सततच्या दरुगधीमुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक भागातून ये-जा करताना आटय़ापाटय़ाचा खेळ खेळावा लागतो. ऐतिहासिक बिरुद मिरवणाऱ्या कल्याणमध्ये प्रवेश करताना ऐतिहासिक स्थळांऐवजी कचऱ्याचे ढीग, फेरीवाल्यांची जत्रा रोज पाहावी लागते. रेल्वे स्थानक भागात लक्ष्मी भाजीबाजार भरतो. हा बाजार कृषी बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित केला तर, रेल्वे स्थानक भागातील वाहतूक कोंडी, दरुगधी हे प्रश्न सुटू शकतात.
प्रसिद्ध साहित्यिक वि. आ. बुवा यांचे कल्याणमध्ये वास्तव्य होते. त्यांच्या ग्रंथसंपदेने कल्याणची आणखी एक साहित्यिक ओळख सर्वदूर पसरली. साहित्यिक बुवा यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्व, साहित्यिक महत्त्वाला साजेसा उपक्रम पालिकेने सुरू करणे आवश्यक आहे. पालिकेच्या एखाद्या वास्तूत वि. आ. बुवा यांची ग्रंथसंपदा, त्यांची छायाचित्रे, वाचनालय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर बुवांच्या साहित्याचे एक बोलते व्यासपीठ शहरात निर्माण होईल.
शहरात खेळांची मैदाने नसल्याने खेळाडूंना सराव, प्रशिक्षणासाठी ठाणे, मुंबई येथे जावे लागते. कल्याण परिसरात भव्य खेळ मैदान आहेत. भूखंड आहेत. ती चिखल माती, पालिकेच्या भंगार, साहित्यांनी भरली आहेत. पालिकेने ते मैदान विकसित करून खेळाडूंना उपलब्ध करून दिली पाहिजेत. आधारवाडी क्षेपणभूमी कल्याणला शाप वाटू लागली आहे. या क्षेपणभूमीवरील कचरा कुजल्यामुळे दररोज संध्याकाळनंतर या भागातून प्रचंड दरुगधी सुटून ती शहरभर पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. उंबर्डे येथील क्षेपणभूमी पालिकेने तातडीने सुरू केली तर दरुगधीचा त्रास कमी होईल. कल्याणची ‘सुंदर नगरी’ करताना हे शहर स्वच्छ, सुंदर राहील या दृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 12:10 am

Web Title: citizen should take responsibility for making kalyan city beautiful
Next Stories
1 अनधिकृत रिक्षा वाहनतळांची डोकेदुखी
2 गुन्ह्यंत वाढ, तपासात खो
3 अर्ज विक्रीतून सेनेचा पक्षनिधी
Just Now!
X