22 October 2020

News Flash

५३ लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत

दीड लाखाहून अधिक संशयित रुग्ण; अनेकांना सारी, इन्फ्युएन्झा, करोना, साथीच्या आजारांची लक्षणे

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह््यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह््यातील ५३ लाख ५० हजार ९७१ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये सारी, इन्फ्युएन्झा, करोना आणि साथीच्या आजाराची लक्षणे असलेले १ लाख ६९ हजार २८९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांच्या पुढील तपासण्या करण्यात येत आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांची पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करत आहेत. ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान, नाडी तपासणी केली जात आहे. तसेच सारी, इन्फ्युएन्झा यांसारखा संसर्ग आणि करोनाची लक्षणे आहेत का, याचीही तपासणी केली जात आहे. या पथकांना सर्वेक्षणादरम्यान आजारामुळे प्रकृती खालावलेला रुग्ण आढळून आला तर, त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतात. रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात येते. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत ५३ लाख ५० हजार ९७१ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात सारी, इन्फ्युएन्झा यांसारखा संसर्ग, करोना आणि साथीच्या आजारांची लक्षणे असलेले १ लाख ६९ हजार २८९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

सर्वेक्षणासाठी  २,२२१ पथके

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या स्तरावर पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांमध्ये आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, काही खासगी कामगारांचा समावेश आहे. जिल्ह्यात अशी एकूण २ हजार २२१ पथके नेमण्यात आली आहेत. त्यामध्ये ठाणे महापालिका ५७०, कल्याण-डोंबिवली महापालिका २२५, भिवंडी महापालिका ३५२, बदलापूर नगरपालिका ११३, अंबरनाथ नगरपालिका १४१, ठाणे ग्रामीण ६३२ आणि उल्हासनगर महापालिका १८८ पथकांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:09 am

Web Title: citizens health survey completed corona infection virus akp 94
टॅग Coronavirus
Next Stories
1 भटक्या श्वानांची दहशत
2 पालिकेच्या मोफत आरोग्य सेवेचे धिंडवडे
3 वसई-विरारमध्ये पाण्याची नासाडी
Just Now!
X