22 October 2020

News Flash

करोना चाचणीला नागरिकांचा विरोध

पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील गणेश देवल नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या रहिवाशांनी करोना चाचणी करण्यास विरोध दर्शवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व रहिवाशांनी पालिका मुख्यालयात येऊन चक्क ठिय्या आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्यात येत आहे; परंतु त्यास भाईंदर पश्चिम भागातील गणेश देवल नगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी आरोप केले आहेत की, प्रत्येकाची बळजबरीपणाने करोना चाचणी करण्यात येत असून त्यामुळे लहान मुलांच्या आणि महिलांच्या नाकाला इजा होत आहे. तसेच करोनाच्या नावावर गेल्या पाच महिन्यांपासून लादण्यात आलेल्या नियमांमुळे बेरोजगार होण्याची वेळ त्यांवर आली आहे. त्यामुळे ‘आयुक्त बदलो’ अशी घोषणा देत नागरिकांनी पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:31 am

Web Title: citizens oppose the corona test in bhayandar zws 70
Next Stories
1 पाणपोईभोवती कचऱ्याचे डबे
2 परिवहन ठेका रद्द न झाल्याने बसगाडय़ा जागीच
3 भिवंडीत इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू
Just Now!
X