19 February 2019

News Flash

चिकणे पाडा (कल्याण) प्रभाग क्र : ९०

कल्याण पश्चिमेचा विकास झाला, परंतु पूर्वेकडे मात्र पालिका प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे.

नीता सावंत , कमल कोळी , तन्वी घाग

कल्याण पश्चिमेचा विकास झाला, परंतु पूर्वेकडे मात्र पालिका प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. कल्याण पूर्वेला सायंकाळच्या वेळेस यायचे म्हटले तर रेल्वे पटरी ओलांडावी लागते किंवा बोगद्यातून प्रवास करावा लागतो. या समस्यांचे निवारण करुन देणारा नगरसेवक आता नागरिकांनी निवडून द्यावा. – नीता सावंत

शहरांचा दिवसेंदिवस कायापालट होत आहे, त्याचबरोबर लोकसंख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. महिलांना साधी भाजी आणायचे झाले, तर स्टेशन परिसर गाठावे लागते. रस्त्यांची कामे आता करण्यात आली असली तरी पाण्याची समस्या अद्याप आहे. मुलभूत समस्या सोडविणारा नगरसेवक निवडूण देणे गरजेचे आहे.– कमल कोळी

केवळ जुना कार्यकर्ता म्हणून नाही, तर ज्यांना समस्यांची जाण आहे. जो आपल्या समस्या महासभेत प्रखरतेने मांडून प्रभागातील समस्या सोडवू शकतो, असा नगरसेवक निवडूण देणे गरजेचे आहे. जरीमरीनगर परिसरातील रस्त्यांची कामे नुकतीच करण्यात आली आहेत. मात्र येथे वीज व पाण्याची समस्या अद्याप कायम आहे. ती सोडविणारा नगरसेवक हवा.- तन्वी घाग

First Published on October 15, 2015 12:16 am

Web Title: citizens should elected councilors who troubleshoot problems
टॅग Kdmc Poll