तीन महिन्यांत मालमत्ता कर, पाणी देयकाची एकूण सुमारे २५० कोटी रुपयांच्या कराची वसुली महापालिकेस करायची आहे. या वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कल्याण, डोंबिवलीतील सर्व नागरी सुविधा केंद्रे मार्चअखेपर्यंत रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आठवडय़ातील सहा दिवस ही केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर रविवारी नोकरदारांना सुट्टी असते. त्यांना वेळ काढून कर भरणा करता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिन, धूलिवंदन या दिवशी ही केंद्रे बंद राहणार आहेत. ६ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत नागरी सुविधा केंद्रे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहेत.