News Flash

बदलापूर नगरपालिकेचा आज ‘स्वच्छतेचा जागर’

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेत जागृती करण्याचे काम आरंभले आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेत जागृती करण्याचे काम आरंभले आहे. यासाठी पालिकेने शहरातील १०७ शाळांच्या सहकार्याने स्वच्छता जागर करण्याचे ठरवले असून शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक शाळा आपापल्या विभागातून प्रभातफेरी काढत पूर्वेकडील कुळगाव शाळेत एकत्र येणार आहे.

ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पालिकेने स्वच्छता प्रभात फेरी व पथनाटय़स्पर्धाचे आयोजन केले आहे. शहर स्वच्छतेत शाळा व त्यांच्या मुलांचा सहभाग असावा या हेतूनेच पालिकेने शाळांना या स्वच्छता जागरात सहभागी करून घेतले आहे. यावेळी, प्रत्येक शाळा आपापल्या विभागातून प्रभात फेरी काढत तसेच पथनाटय़ सादर करत पूर्वेकडील कुळगाव मराठी शाळेत प्रभात फेरीचा समारोप करणार आहे. स्पर्धेचे परिक्षण करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:44 am

Web Title: cleanliness awareness by badlapur municipality today
Next Stories
1 कोंडीमुक्त कल्याणसाठी नाल्यावर वाहनतळ
2 दत्तनगर ‘झोपु’ योजनेतील लाभार्थ्यांची चौकशी
3 ब्रह्मांड कट्टय़ावर ‘कटय़ार काळजातील सूर’ उमटले
Just Now!
X