शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा शुभारंभ पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्न खिलारे व अशोक पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. अभियानाची सुरुवात व्हॅनमधील स्क्रीनवर स्वच्छतेविषयक माहितीपट दाखवून करण्यात आला. हे अभियान जिल्ह्यात २ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छतेविषयक व्यापक जागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या ग्रामपंचायती, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर ही डिजिटल व्हॅन फिरवण्यात येणार आहे.

परिसर स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकोल बंदी आदी विषयांवर माहितीपटातून जनजागृती करण्यात येणार आहे. गाव शाश्वत, स्वच्छतेसाठीच्या उपाययोजनांची माहितीही या वेळी देण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान पाण्याचे स्रोत व सार्वजनिक परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness service campaign launched by zilla parishad
First published on: 20-09-2018 at 02:16 IST