News Flash

‘इंटरनेट कॉल’द्वारे तरुणींची छळवणूक

सध्या वसईतील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना अज्ञात व्यक्तींकडून इंटरनेल कॉल येत आहेत.

विद्यार्थिनींना ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी तसेच अश्लील संभाषण करण्यासाठी आता इंटरनेट कॉलचा वापर होऊ लागला आहे.

अश्लील संभाषण आणि ‘ब्लॅकमेल’ विरोधात चार तक्रारी दाखल

महाविद्यालयीन तरुणी तसेच शालेय विद्यार्थिनींना ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी तसेच अश्लील संभाषण करण्यासाठी आता इंटरनेट कॉलचा वापर होऊ  लागला आहे. वसईत अशा प्रकारच्या चार तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. अंडरवर्ल्ड गुंड पूर्वी या कॉलचा वापर करत होते. या इंटरनेट कॉल करणाऱ्याचा ठावठिकाणा समजत नसल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले असून तरुणी तसेच शालेय विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या वसईतील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना अज्ञात व्यक्तींकडून इंटरनेल कॉल येत आहेत. कॉल करणारी व्यक्ती या मुलींशी अश्लील संभाषण करत आहे तसेच समाज माध्यमातून वैयक्तिक माहिती काढून त्या आधारे ब्लॅकमेल करत आहे.  वसई-विरारमध्ये या संदर्भातील एकूण चार तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. यापैकी विरारच्या एका महाविद्यालयात १२वीत शिकणाऱ्या मुलीने तक्रार केली आहे. तर वसई-विरारमधील वेगवेगळ्या तीन शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी या तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत. प्रियकराशी असलेले संबंध जाहीर करेन, माझ्याशी संबंध ठेव अशी मागणी या कॉल करणाऱ्या आरोपीने केल्याची तक्रार या १२वीत शिकणाऱ्या मुलीने दिली आहे. तर इंटरनेट कॉल करणारी व्यक्ती सतत अश्लील संभाषण करत असल्याचे शाळकरी विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारच्या कॉलमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारचे कॉल आल्यास तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इंटरनेट कॉल काय आहे?

इंटरनेट कॉल्सवा व्हीओआयपी अर्थात ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ असे म्हणतात. हे इंटररनेट कॉल असल्याने ते कुणी आणि कुठून केले ते तपासता येत नाही. या इंटरनेट कॉल्सचे क्रमांक ५ आकडीदेखील असतात. हा इंटरनेट कॉल सुरू असताना तो कुठून केला त्याचा मागोवा काढता येत नाही. अंडरवर्ल्ड गुंड परदेशात राहून भारतात व्यावसायिकांना धमकी देण्यासाठी अशा प्रकारच्या कॉल्सचा वापर करत असतात. पण हे तंत्रज्ञान आता अधिक विकसित झाल्याने ते तरुणांना वापरता येऊ  लागले आहे.

आमच्याकडे एकूण अशा स्वरूपाच्या चार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहोत.

– राजतिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:20 am

Web Title: college and school girls harassing by obscene internet call in vasai
Next Stories
1 पोलिसांच्या जागेवरही भूमाफियांचा डल्ला
2 तपासचक्र : सौदेबाजीतून सुटका
3 मैदानप्रश्नी सेनेत खदखद
Just Now!
X