महाविद्यालयात विद्यार्थी अभ्यासासोबत विविध कलांची साधना करीत असतात. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून महाविद्यालयांमध्ये निरनिराळे महोत्सव आयोजित केले जातात. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत महाविद्यालयीन महोत्सव असले तरी महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याने दिवाळीच्या सुट्टीचा विद्यार्थी पुरेपूर उपयोग करतात. सुट्टीमध्येही विद्यार्थी महाविद्यालयात हजेरी लावत असून महोत्सवाच्या तयारीची लगबग महाविद्यालयामध्ये दिसत आहे.

यंदाच्या महोत्सवाची थीम काय ठेवावी, स्पॉन्सरशिप कशी गोळा करावी, महोत्सवाचे बजेट, इव्हेंट्स काय ठेवावेत, कोणकोणत्या महाविद्यालयाला आमंत्रित करायचे, महोत्सव प्रमुख ठरवणे, महोत्सवाची टीम तयार करणे यासाठी विद्यार्थ्यांच्या सभा महाविद्यालयात आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. जोशी- बेडेकर महाविद्यालयाच्या गंधर्व महोत्सवाकडे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदा महोत्सवाचे दहावे वर्ष आहे. गेल्या वर्षी स्वदेशी ही थीम घेऊन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वर्षी नवीन काही तरी विषय घेऊन महोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. दर वर्षी निरनिराळ्या ठिकाणांतील शंभरहून अधिक महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी या गंधर्व महोत्सवासाठी उत्सुक आहेत. विद्यार्थी गंधर्व महोत्सवाची तयारी स्वत: करत असतात आणि महाविद्यालय सर्वागाने त्यांच्या सोबत असते, असे मत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. अर्चना प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

(हृषीकेश मुळे)

 

एक पणती सैनिकांसाठीउपक्रमातून विद्यार्थ्यांची कृतज्ञता

पडघा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘कला व वाणिज्य महाविद्यालय’ व ‘विवेकानंद प्रतिष्ठान’ पडघा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘पणती सैनिकांसाठी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पडघा पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक भास्कर पुकळे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. पडघा गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ बंधू-भगिनी महाविद्यालयाच्या या उपक्रमात उपस्थित होते. आज आपले जवान सीमेवर प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करत असताना देशांतर्गत शांतता आणि सलोखा कायम राखणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. पोलिसांसमोर असामाजिक तत्त्वांना प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान असते. त्यामध्ये नागरिकांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून कान डोळे उघडे ठेवून पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. पोलिसांना केलेले सहकार्य हीदेखील एक प्रकारे देशसेवाच ठरेल, असे प्रतिपादन भास्कर पुकळे यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी विठ्ठल मंदिर परिसर तीनशेहून अधिक पणत्यांनी सुशोभित करण्यात आला होता.

(मानसी जोशी)

 

महाविद्यालयाच्या आवारात नो शेव्ह नोव्हेंबरची क्रेझ

नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि थंडीची चाहूल लागली. दुसऱ्या सत्रातील अभ्यासाला सामोरे जातानाच महाविद्यालयीन विश्वात आता महोत्सव आणि उपक्रमांचे वेध लागले आहे. सध्या महाविद्यालयीन तरुणांमध्ये ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची क्रेझ आहे. थोडक्यात काय नोव्हेंबर महिन्यात दाढी करायची नाही. दाढी आणि मिसरूड फुटू लागली की मुलांना आपण मोठे झालो असे वाटते. रोजच्या रोज दाढी करणे एकेकाळी सभ्यपणाचे लक्षण मानले जात होते. आता दाढी राखण्याची फॅशन आहे. सध्या चित्रपटांमधील बहुतेक नायक दाढी राखताना दिसतात. त्यांचेच अनुकरण तरुण पिढी करू लागली आहे. त्यामुळेच यंदा ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या चळवळीचा फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसमधून प्रचार सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये दाढी न करण्याची पद्धत परदेशात गेली चार ते पाच वर्षांपासून रूढआहे. जगभरात ही पद्धत लोकप्रिय झालेली आहे. यात पुरुषांचे ‘आरोग्य’ आणि ‘प्रोस्टेट कॅन्सर’ याविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी या हेतूने ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या संकल्पनेचा जन्म झाला. कॅन्सर  रुग्णाचे उपचारादरम्यान केस गळतात. त्यामुळे संपूर्ण महिनाभर केस  वाढवून दाढीसाठी खर्च होणारे पैसे कॅन्सरसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांना दिले जातात. त्यासाठी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात दाढीला वस्तरा लावला जात नाही.

या निमित्ताने दाढी असताना आणि दाढी काढल्यावरचे फोटो मुले डीपी म्हणून ठेवताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’मागील खरा अर्थ महाविद्यालयीन मुलांना समजलेला आहे. त्यामुळे याकडे फॅशन म्हणून न पाहता तरुण मुले गंभीरतेने याची दाखल घेऊ  लागलेले आहेत.

(मानसी जोशी)

‘नो शेव्ह नोव्हेंबर’बद्दल माहिती नव्हते. महाविद्यालयातील नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची होती. त्यामुळे दाढी वाढवली. मला आवडल्यामुळे चार महिन्यांपासून दाढी केलेली नाही. ‘नो शेव्ह..’ संकल्पना समजल्यावर मी दाढीचे पैसे वाचवून ठेवले आहे. डिसेंबर महिन्यात एका समाजसेवी संस्थेला हे पैसे देणार आहे

यश बाचल, जोशी बेडेकर महाविद्यालय.

 

जोशी बेडेकरला सलग तिसऱ्यांदा नॅकचा दर्जा

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडकर महाविद्यालयाला ‘नॅशनल असेसमेंट एण्ड ऑक्रिडिटेशन कौन्सिल’ या बंगळुरू येथील संस्थेने ‘अ’ दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाला ‘नॅक’तर्फे मिळालेले हे तिसरे मूल्यांकन होते. जोशी बेडेकर महाविद्यालयाला १७ ते १९ ऑक्टोबरच्या कालावधीत ‘नॅक’ने नियुक्त केलेल्या समितीने भेट दिली होती. हे मूल्यांकन प्रामुख्याने अभ्यासक्रमातील गुणवत्ता, शैक्षणिक मूल्यमापन, संशोधन आणि कन्सल्टन्सी, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक साधने, महाविद्यालयाचे व्यवस्थापन, महाविद्यालयामध्ये राबवल्या जाणाऱ्या नवीन शैक्षणिक संकल्पना यावर आधारित होते. समितीने दिलेल्या भेटीमध्ये महाविद्यालयातील सोळा अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करून संबंधित सर्व घटकांशी समितीने संवाद साधला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांचा समावेश होता. महाविद्यालयाने ‘अ’ दर्जा राखल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग आणि विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जीवनदीप महाविद्यालयात महाराष्ट्र कौशल्य विकासाचेअभ्यासक्रम

विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत कौशल्यविकास अभ्यासक्रमाचे ज्ञान मिळण्यासाठी गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासा’चे मोफत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी डी.टी.पी., इलेक्ट्रिकल, फोटोग्राफी आणि मास कम्युनिकेशनसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळावता येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता योगाचे अभ्यासक्रमदेखील घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाच्या परिसरातील महिला बेरोजगारी नष्ट होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या कौशल्यात भर पडावी, याकरिता महाविद्यालयात शिवणकाम व सौंदर्यशास्त्र यांसारखे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

(प्रशांत घोडविंदे)