13 August 2020

News Flash

आयुक्तांनी डोंबिवली पूर्व भागातही ‘फेरी’ मारावी

आयुक्त ई. रवींद्रन यांच्या पुढाकारामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला आहे

आयुक्त ई. रवींद्रन यांच्या पुढाकारामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. मात्र आयुक्तांचे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे फेरीवाले डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत. आयुक्त रवींद्रन यांनी एक दिवस कोणालाही न सांगता कल्याण येथून लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकात यावे आणि पूर्व भागात बसणारे फेरीवाले स्वत:च्या नजरेने पाहावे. म्हणजे महापालिकेचे कर्मचारी किती ‘प्रामाणिकपणे’ डोंबिवलीत काम करतात याचा प्रत्यय आयुक्तांना येईल, अशी चर्चा डोंबिवलीकरांमध्ये सुरू झाली आहे.

रेल्वे पादचारी पुलाच्या हद्दीत बसणारे फेरीवाले रेल्वे पोलिसांनी कायमचे हटविले आहेत. मात्र महापालिकेच्या हद्दीत स्कायवॉकवर, पुलाखाली, पदपथ,  रॉथ, पाटकर रस्त्यावरील फेरीवाले हटण्यास तयार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 1:12 am

Web Title: commissioner of dombivali must attention towards dombivali east
टॅग Commissioner
Next Stories
1 ..पण ‘केडीएमटी’चे कर्मचारी नाराज!
2 कोपर पुलावर बोअरवेलची गाडी बंद
3 वाचक वार्ताहर- रेतीबंदर-मंत्रालय बसफेरी बंद का?
Just Now!
X