15 July 2020

News Flash

ठाणे शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू

एक ते दोन दिवसांमध्ये अन्य दुकानांबाबत नवा आदेश येण्याची शक्यता

टाळेबंदीत काही प्रमाणात सूट दिल्यानंतर मुंबईत सोमवारी अनेक ठिकाणी दुकाने सुरू झाली.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहरात लागू केलेली शंभर टक्के टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेऊन महापालिका प्रशासनाने सोमवारपासून शहरातील जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाल्याची दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत खुली केली. त्यामुळे सहा दिवसांनंतर धान्य आणि भाजीपाला मिळाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. असे असले तरी जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्या व्यतिरिक्त अन्य दुकाने खुली करण्याचे संकेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी दिले असून यामुळे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये अन्य दुकानांबाबत नवा आदेश येण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे  प्रशासनाने शहरातील काही परिसर यापूर्वीच पूर्णपणे बंद केले होते. त्यापाठोपाठ संपूर्ण शहरातच शंभर टक्के टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शहरात ठरावीक वेळेत सुरू असणारी जीवनावश्यक वस्तूंची आणि भाजीपाल्याची दुकाने बंद करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:26 am

Web Title: commodity shops open in thane city abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘रुणवाल माय सिटी’तल्या विलगीकरण केंद्रावरुन कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद
2 ठाणे: निवृत्तीच्या दिवशीच पालिका कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू; एक कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
3 धक्कादायक! करोनाबाधित महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी बॅगबाहेर काढला मृतदेह; १८ जणांना झाला संसर्ग
Just Now!
X