28 February 2021

News Flash

कल्याणमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार

बाजार समितीच्या पाठीमागील बाजूस गाडी नेऊन तेथे बलात्कार केला

(संग्रहित छायाचित्र)

वायले नगर प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती उद्योजक साईनाथ तारे यांनी, बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.

साईनाथ तारे याने आपल्यावर दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला. त्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास पती आणि मुलीला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

तारे याने दोन वर्षांपूर्वी व्यवसायात भागीदारीसाठी आपल्याला नेतिवली येथील मेट्रो मॉलमध्ये बोलावले. तेथे आपल्याशी लगट केली आणि ऑडी कारमध्ये अश्लिल चाळे केले. हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून तो प्रसारित करण्याची धमकी दिली होती. बाजार समितीच्या पाठीमागील बाजूस गाडी नेऊन तेथे बलात्कार केला आणि हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला तक्रार केल्यास ही चित्रफीत पतीला पाठवण्याची आणि प्रसारित करण्याची धमकी दिली, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:32 am

Web Title: complaint of rape against husband of shiv sena corporator in kalyan abn 97
Next Stories
1 ठाण्यात आठ बोगस डॉक्टरांवर कारवाई
2 लोकलगर्दीचे १४३ बळी
3 पाश्चात्त्य ठेक्यावर अभंगाचे सूर
Just Now!
X