शहरात सुरू असलेल्या रस्ते रूंदीकरण आणि कॉंRि टीकरणाच्या कामामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.  बदलापूर पश्चिमेतील दत्त चौक परिसरात कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्ते खोदल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरूंद झाला आहे. असे असताना नव्या रस्त्यावर पाणी मारण्यासाठी भर रस्त्यात टँकरने उभा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

अंबरनाथ फॉरेस्ट नाका ते बदलापुरातील होप इंडियापर्यंत रस्ते रूंदीकरण आणि कॉंRि टीकरणाच्या कामासाठी सध्या बदलापूर पश्चिमेतील शहराच्या प्रवेशद्वारापासून थेट रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता खोदण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाबाबत सुरूवातीपासूनच अनेक तRोरी  आल्या होत्या. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथच्या दिशेने जाणारी एक कार या खड्डय़ात पडता पडता थोडक्यात वाचली. सुदैवाने चालकाच्या वेळीच  लक्षात आले आणि त्याने इतर वाटसरुंच्या मदतीने   अडकलेले गाडीचे चाक बाहेर काढले. त्यामुळे मोठा अपघात टळला. या कामासाठी रस्त्याची एक बाजू पूर्ण खोदल्याने अरूंद अशा दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे.

यापूर्वीही रस्त्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामात कारचा अपघात घडल्याच्या तक्रारी आहेत. तयार केलेल्या रस्त्यावर पाणी मारण्यासाठी कंत्राटदाराचे कामगार चिंचोळ्या रस्त्यावर टँकर उभे करून पाणी मारत असतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी  बदलापूरात होत आहे. आधीच रस्त्यांवरून वाहन चालवताना कसरत करावी लागते. त्यात अशा टँकरमुळे होणाऱ्या कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचा सुर आहे.

पर्यायी रस्ता शक्य

जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापासून ते उड्डाणपूलापर्यंत गणेश चौक-पाटील मंगल कार्यालय-गोविंद धाम वसाहतीमार्गे असलेला रस्ता चांगला पर्याय होऊ  शकतो. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणची वाहतुक कोंडीही कमी करता येणे शक्य आहे. दत्त चौक परिसरातही मोठय़ा प्रमाणावर वाहतुक कोंडी होते, यावर हा उपाय योग्य ठरू शकतो.

बेलवली ते उड्डाणपूल या भागात रस्ता खोदलेला असून याच भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतुक सुरू असते. त्यात टँकर रस्त्यात उभे करुन पाणी देण्याचे काम सुरु असते. पाणी देण्याचे काम रात्रीच्या वेळेत झाल्यास कोंडी होणार नाही. याठिकाणी एकेरी वाहतुक करून रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 मयुरेश रोडगे, नागरिक