25 February 2021

News Flash

गावसमावेशाला काँग्रेसचा तीव्र विरोध

गेल्या १५ वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या नियोजनशून्य २७ गावांना बकालपण आल्यानंतर त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

| March 17, 2015 12:08 pm

गेल्या १५ वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या नियोजनशून्य २७ गावांना बकालपण आल्यानंतर त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेल्या या गावांचा भार महापालिकेवर टाकल्यास कल्याण डोंबिवलीतील मूळ नागरिकांवर अन्याय करण्यासारखे आहे, अशी भूमिका या भागातील कॉग्रेस पक्षाने घेतली आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा यासारख्या शहरांचा नियोजनाअभावी आधीच बोजवारा उडाला आहे. असे असताना २७ गावांच्या विकासाचा भार महापालिकेला पेलवेल का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
मालमत्ताकराचा बोजा वाढला असल्याचे कारण सांगत १५ वर्षांपूर्वी स्थानिक संघर्ष समितीने ही गावे महापालिकेतून वगळावीत, अशी मागणी लावून धरली होती. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी ग्रामस्थांना सहानभूती दाखविण्याची भूमिका घेतली होती. गावांना महापालिकेचे कर अधिक वाटत असतील तर ते कमी करण्याची भूमिका घेऊ, असे महापालिकेचे म्हणणे होते. या गावांकडून जमा होणारा महसूल, त्या बदल्यात देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांचा आपण एकत्रित विचार करू, असे संघर्ष समितीच्या नेत्यांना त्यावेळी लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते. असे असताना संघर्ष समितीने गावे वगळण्याचा हट्ट कायम ठेवला.  गावे महापालिका हद्दीतून वगळून पालिकेला आर्थिक, नागरीकरणाच्या दृष्टीने पंगू केले. अशा परिस्थितीत पालिकेने आपला गाडा कायम ठेवला, अशी भूमीका महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. २७ गावांमध्ये पंधरा वर्षांत फिरते प्रशासन राहिले. या गावांना जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, एमएमआरडीएकडून कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा देण्यात आल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:08 pm

Web Title: congress strongly opposed to the inclusion of the village
टॅग : Congress
Next Stories
1 टी. चंद्रशेखर यांचे भाकित अखेर खरे
2 बदलापूरमध्ये निवडणूक गोंधळ सुरूच!
3 शेतकऱ्यांच्या नशिबी ‘भोग’
Just Now!
X