30 September 2020

News Flash

करोनामुळे मच्छीमार आर्थिकदृष्टय़ा हतबल

नव्या हंगामात मासळीला हमीभाव देण्याची मागणी

नव्या हंगामात मासळीला हमीभाव देण्याची मागणी

भाईंदर : करोनाच्या टाळेबंदीचा मत्स्यनिर्यातीला फटका बसल्याची सबब पुढे करून व्यापारी मच्छीमारांकडून अत्यंत कमी किमतीत मासळी खरेदी करण्याची चिन्हे असल्यामुळे शासनाने ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या नवीन मासेमारी हंगामापासून मच्छीमारांना हमीभाव द्यावा आणि मासळी खरेदी करावी, अशी मागणी उत्तन येथील मच्छीमारांनी केली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २५ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून इतर व्यवसायाप्रमाणेच मासेमारी व्यवसायाला देखील मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. मच्छीमारांनी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ापर्यंत मासेमारी बंद ठेवली होती. शेवटच्या आठवडय़ात मच्छीमारांनी मासेमारी केली. मात्र, टाळेबंदीमुळे मत्स्यनिर्यात थांबल्याने निर्यातदार कंपन्या मासळी घेत नसल्याची सबब पुढे करून व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी किमतीत मच्छीमारांकडून मासळी खरेदी केली होती. त्याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसला होता.

आता १ ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात होत आहे. मात्र, अजूनही मत्स्यनिर्यातीबाबत स्पष्टता नाही. टाळेबंदीनंतर आता चीनबरोबरील संबंधांमध्ये कटुता आल्यामुळे चीनमधील मत्स्यनिर्यात ठप्प झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. अनेक व्यापारी मासळी खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचेही समजते. या पाश्र्?वभूमीवर मच्छीमार मासेमारीला गेले तरी जाळ्यात आणलेली मासळी विकायची कोणाला, असा प्रश्?न निर्माण झाला आहे. काही व्यापारी अत्यंत कमी किमतीत मासळी खरेदी करून मच्छीमारांचे आर्थिक नुकसान करतील, अशी भीती मच्छीमारांना आहे. त्यामुळे शासनाने मासळीला हमीभाव जारी करून मच्छीमारांची मासळी खरेदी करावी, अशी मागणी उत्तन येथील मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे.

भाईंदर पश्चिम परिसरातील उत्तन समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मासेमारी केली जाते. ऑगस्ट ते डिसेंबर हा मासेमारीचा मुख्य हंगाम असून या काळात कोटय़वधी रुपयांची उलाढाल मासळी बाजारात होते. परंतु यंदा करोनाचे संकट आणि  निर्यातीवर असलेले निर्बंध यामुळे मत्स्यनिर्यातदारांनी मासळीकडे पाठ फिरवल्याचे मत्स्यपुरवठादार व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (मरीन प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी) मध्यस्थीने राज्यातील मासळी निर्यातदाराना एकत्र बोलावून मासळीचे दर निश्चित करावे अथवा शासनाने मासे खरेदी करून मच्छीमारांना योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी उत्तनच्या मच्छीमारांनी पुढे केली आहे.

शीतगृह उभारण्याची मागणी

उत्तन भागात मोठय़ा प्रमाणात मासेमारी करण्यात येते. परंतु पकडून आणलेले मासे ठेवण्याकरिता शीतगृहाची व्यवस्था नसल्यामुळे मच्छीमारांना नाइलाजाने ते मासे कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावे लागतात. यामुळे मच्छीमारांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक वेळा पाहणी करूनदेखील शीतगृहाच्या निर्मितीच्या कार्यवाहीला आरंभ झालेला नाही. यामुळे मच्छीमार समाजात नाराजी असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी दिली.

शीतगृहासाठी मच्छीमारांनी माझ्याकडे मागणी केली असून या संदर्भात मी विधानसभेत लक्षवेधी घेणार आहे.

– गीता जैन, आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:24 am

Web Title: corona makes fishermen financially weak zws 70
Next Stories
1 रुग्णसंख्या वाढली तरी घाबरू नका!
2 वाहतूक विभागाला गोदामाकरिता जागा मिळेना
3 मुख्य रस्त्यावरील खड्डय़ांमुळे प्रवासी संतप्त
Just Now!
X