News Flash

बदलापुरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, ८ जणांना झाली लागण

संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आज ८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात ३ जणांना करोनाची लागण झाली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिन्ही रुग्णांना उल्हासनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. नव्याने लागण झालेले करोनाचे आठही रुग्ण हे आधीच्या तिघांशी संबंधित असल्याचं कळतंय.

काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व २० वर्षीय मुलीला करोनाची लागण झाल्याचं समजलं होतं. लॉकडाउन काळातही साताऱ्यात नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेले असताना, करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे यांना करोनाची लागण झाली. यानंतर बदलापूरात आल्यानंतर सोसायटीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व मुलगी आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या नातेवाईकांचीही चाचणी केल्यानंतर चार जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याचं कळतंय.

दुसऱ्या प्रकरणात वोकहार्ट रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. प्रशासनाला ही बाब समजताच त्याला क्वारंटाइन करण्यात आलं. मात्र बदलापूरमध्ये हा रुग्ण आपल्या बहिणीच्या घरात गेलेला होता, त्यामुळे बहिणीच्या घरातल्यांचीही चाचणी करण्यात आली, ज्याच्यात आणखी ४ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. नवीन रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे, नव्याने बाधित करोना रुग्ण हे बदलापूरमधील एका डॉक्टर आणि भाजीवाल्याच्या संपर्कात आले होते, मात्र या दोघांचेही अहवाल निगेटीव्ह आल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 9:17 pm

Web Title: corona positive patients increase in badlapur 8 new cases found psd 91
Next Stories
1 वांद्रे येथील घटनेपाठोपाठ भिवंडीतही वाजली धोक्याची घंटा?
2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला करोनाची लागण
3 पालघरच्या ग्रामीण भागात करोना व्हायरसचे १० नवीन रुग्ण
Just Now!
X