News Flash

ठाण्यात उपचाराधीन रुग्णांत घट

करोनामुक्तीचे प्रमाण वाढून ८७ टक्क्यांवर

करोनामुक्तीचे प्रमाण वाढून ८७ टक्क्यांवर

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत घट होत असताना शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा दिवसांत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ होऊन ते ८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही साडेतीन हजारांहून अधिक घट झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच १ मार्चला १७३८ सक्रिय करोना रुग्ण होते. याच दिवशी एकूण ५९ हजार ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. हे प्रमाण ९६ टक्के इतके होते. त्यानंतर शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला. दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत आले. सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजारांपर्यंत पोहोचली. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिलला शहरात १६ हजार ५ उपचाराधीन रुग्ण होते. मात्र गेल्या दहा दिवसांत ही संख्या कमी होऊन १२ हजार ४०२ इतकी झाली आहे.

ठाणे शहरात लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण घरीच उपचार घेत असून अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. महापालिका डॉक्टरांचे पथक अशा रुग्णांशी बोलून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतात आणि त्यामध्ये दहा दिवसांनंतर रुग्ण बरे झाल्याचे आढळून आले तर त्यांची करोनामुक्त म्हणून नोंद केली जाते. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या ज्या रुग्णांना प्राणवायूची गरज लागते, त्या रुग्णांना मात्र बरे होण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. तसेच शहरात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून यामुळे शहरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठाणे शहरातील दहा दिवसांतील आकडेवारी

 तारीख   नवे रुग्ण    करोनामुक्त

१६ एप्रिल      १४१०   १८७६

१७ एप्रिल      १४७५   १६१०

१८ एप्रिल      १५९३   १८२४

१९ एप्रिल      १२९०   १८२०

२० एप्रिल      १२९४   १४५६

२१ एप्रिल      १२६६   १७०२

२२ एप्रिल      १४५८   १३८१

२३ एप्रिल      ११३७   १५२७

२४ एप्रिल      ११०८   १६७५

२५ एप्रिल      १०५४   १४९५

२६ एप्रिल      ६९८     १३५०

एकूण        १३,७८७   १७,७१६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:39 am

Web Title: corona recovery rate rises to 87 percent in thane zws 70
Next Stories
1 रेमडेसिविरची चिठ्ठी लिहून देऊ नका
2 तीन वर्षांच्या अपहृत मुलीची सुटका
3 शहापुरातील ठाकर समाजाचा उत्पन्नाधारित शेतीकडे कल
Just Now!
X