ठाणे महापालिका क्षेत्रात करोना प्रसार नियंत्रणात; मृत्युदर २.४९ टक्के

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण करोना रुग्ण संख्येपैकी केवळ १.४९ टक्के रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्क्यांवरून ९६.२६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही २.२४ टक्के इतके आहे. एकूण चाचण्यांमध्ये दररोज रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६.८६ वरून ६.५३ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणेच रुग्ण दुपटीचा कालावधी ३९६ दिवसांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत शहरात ५५ हजार ६३४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५३ हजार ५५१ (९६.२६ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार २५० (२.४९ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सद्य:स्थिती ८३३ रुग्णांवर उपचार सुरू असून त्याचे प्रमाण १.४९ टक्के इतके आहे. तसेच शहरात दररोज शंभरच्या आसपास करोना रुग्ण आढळून येत असून तितकेच रुग्ण दररोज बरे होत आहेत. शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी ३९६ दिवसांवर आला आहे. तर आठवडा करोना रुग्ण वाढीचा वेग ०.२० टक्के इतका आहे. काही दिवसांपूर्वी तो ०.१९ टक्के इतका होता, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग

प्रभाग समिती   १६ नोव्हें.       ३ जाने.

माजिवाडा       ०.४%         ०.३%

वर्तकनगर      ०.४%         ०.३%

उथळसर        ०.३%         ०.४%

दिवा              ०.३%         ०.२%

कळवा           ०.४%         ०.२%

नौपाडा           ०.३%         ०.२%

लोकमान्य-

सावरकर          ०.३          ०.२%

वागळे इस्टेट    ०.२%         ०.२%

मुंब्रा                 ०.१%         ०.१%