करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन प्रतिबंधात्मक क्षेत्रे जाहीर, कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करणार

विरार :  करोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार महापालिका सज्ज झाली आहे. पालिकेने ५५ प्रतिबंधात्मक क्षेत्रे घोषित केली असून वरुण इंडस्ट्री येथे बंद केलेले १०० खाटांचे  रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दोन महिन्यांपासून करोनाचे रुग्ण कमी झाले असताना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. मागील ७ दिवसांत शहरात १५५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे.

करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने वसई पूर्वेच्या वालीव येथील वरुण इंडस्ट्री येथे शंभर खाटांचे रुग्णालय सुरू केले होते. मध्यंतरी करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. आता पालिकेने ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १५० खाटा या ऑक्सिजनच्या असतील. या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि कृत्रिम श्वासन यंत्रणेच्या सुविधा असणार आहेत.

वाढत्या करोना रुग्णांना आळा घालण्यासाठी आणि रुग्णावर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने वसई पूर्वेच्या वालीव येथील वरुण इंडस्ट्री येथे शंभर खाटांचे रुग्णालय सुरू केले होते. मध्यंतरी करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. आता पालिकेने ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १५० खाटा या ऑक्सिजनच्या असतील. या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि कृत्रिम श्वासन यंत्रणेच्या सुविधा असणार आहेत.

सर्व केंद्रावर लसीकरण उपलब्ध करणार

सध्या करोना लसीकरणाचा पहिल्या फळीतील सेवकांना लसीकरणाचे काम सुरू असून ५००० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. येत्या काळात जर रुग्ण संख्या वाढली तर महानगर पालिका सर्व आरोग्य केंद्रावर  लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पालिकेने शहरात ५५ ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रे जाहीर केली आहेत. कोविड १९ च्या लढाईसाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकलची २१७ जणांचा समूह पालिकेने सज्ज ठेवला आहे. तसेच नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील २० जणांच्या चाचण्या करून त्यांचे अहवाल ठेवले जाणार आहेत. सध्या पालिकेने ५५ प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार केले आहेत. या परिसरात जातीने लक्ष ठेवले जात आहे.  पालिकेने ४ ऑक्सिजन रुग्णवाहिका आणि १२ सामान्य रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. तसेच ४३ व्हेन्टीलेटरची व्यवस्था केली आहे. अधिक २८ व्हेन्टीलेटर मागविले जाणार आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. सुसज्ज रुग्णालय पुन्हा सुरू करत आहोत. पालिकेने औषधांचा पुरेसा साठा तयार करून ठेवला असून वैद्यकीय कर्मचारी सज्ज आहेत – डॉ सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका