News Flash

दरवाढीमुळे खवय्यांची कोंबडीकडे पाठ

मागील काही महिन्यांपूर्वी ‘बर्ड फ्ल्यू’च्या आजारामुळे चिकनचे दर कमी झाले होते.

(संग्रहित छायाचित्र)

किमती २०० वरून २६० वर ; विक्रेत्यांनाही अडचणी

वसई: करोनाकाळ सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता चिकनच्या दरात ही वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसात प्रतिकिलोमागे ६० रुपयांची दरवाढ झाल्याने खवय्ये मंडळींनी कोंबडीच्या दुकानाकडे पाठ फिरवली आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी ‘बर्ड फ्ल्यू’च्या आजारामुळे चिकनचे दर कमी झाले होते. त्यानंतर अवघ्या एक दोन महिन्यातच चिकनच्या दराने दोनशेचा टप्पा पार केला आहे. सुरवातीला १८० ते २०० रुपये किलो ने चिकनची विक्री केली जात होती. त्याचे दर आता २४०ते २६० रुपये किलो इतके झाले आहेत. कारण बॉयलर कोंबड्यांच्या अपुऱ्या उत्पादन व पुरवठ्यामुळे ही दरवाढ झाली आहे. काहींना मटण परवडत नाही म्हणून अनेक ग्राहकांचा कल का चिकन खरेदीकडे असतो. परंतु झालेल्या दरवाढीमुळे चिकन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

दुसरीकडे जास्त प्रमाणात झालेल्या भाव वाढीमुळे धंदा परवडत नसल्याने किचन विक्रेत्यांनी आपआपली दुकानेच बंद केली आहेत. लग्नसराई व इतर समारंभ या ठिकाणी चिकनला चांगली मागणी असते परंतु भाव अधिक असल्याने ग्राहकांना माल देणार कसा असा प्रश्न चिकन विक्रेत्यांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे काही चिकन विक्रेत्यांनी  पोल्ट्री फॉर्म कंपनीतून माल खरेदी करण्याचे कमी केले आहे. सुरवातीला मी ५०० ते ६०० किलो माल खरेदी करीत होतो. कारण विविध ठिकाणचे ग्राहक माझ्याकडे येत होते. परंतु आता मी माल खरेदी करणे कमी केले असून केवळ ७० ते १०० किलो इतकाच माल खरेदी करीत असल्याचे चिकन विक्रेते किशोर पाटील यांनी सांगितले आहे. आधी ग्राहकांची दुकानावर गर्दी असायची आता आम्हा विक्रेत्यांना ग्राहकांची वाट बघत उभे राहावे लागते असेही चिकन विक्रेत्यांनी सांगितले आहे.

किलोमागे केवळ ७ ते ८ रुपये नफा

पोल्ट्रीफार्म व्यवसायिकांच्या मनमानी कारभाराचा वसईतील चिकन विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. अचानक भाववाढ झाल्याने चिकन विक्रेत्यांना किलोमागे अवघे ७ ते ८ रुपये नफा मिळत आहे. त्यात आता मजुरांचा खर्च, गॅसवर कोंबडी भाजण्याचा खर्च, वीज बिल, यासह इतर खर्च यामुळे धंदा करणे कठीण होऊन बसले त्यामुळे काही विक्रेत्यांनी दुकानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉयलर कोंबड्यांच्या अपुऱ्या उत्पादन व पुरवठ्यामुळे ही दरवाढ झाल्याचे कोंबडी विक्रेत्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:01 am

Web Title: corona virus infection corona chicken rate akp 94
Next Stories
1 पहिल्याच दिवशी निर्बंधांना नकार
2 घोडबंदर परिसराला करोनाचा विळखा
3 वधू, वराच्या कुटुंबीयांवर गुन्हा
Just Now!
X