२४ तासांत ६ हजार ७७ नवे संसर्गग्रस्त

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी करोना रुग्णसंख्येने ६ हजारांचा टप्पा ओलांडला. रविवारी जिल्ह्य़ात ६ हजार ७७ रुग्ण आढळून आले. करोना रुग्णांची ही उच्चांकी नोंद आहे. तर १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रविवारी रुग्णांची संख्या १ हजार ५०० हून अधिक आढळली.

जिल्ह्य़ातील ६ हजार ७७ करोना रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १ हजार ७०१, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ हजार ६९३, नवी मुंबई १ हजार ४४१, मिरा भाईंदर ३४०, बदलापूर २८६, अंबरनाथ २०३, उल्हासनगर १५९, ठाणे ग्रामीण १५० आणि भिवंडीत १०४ करोना रुग्ण आढळून आले. तर, १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यात ठाणे पाच, मिराभाईंदर पाच, कल्याण-डोंबिवली तीन, नवी मुंबई तीन आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा सामावेश आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्य़ात दररोज सरासरी साडेचार ते पाच हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र, रविवारी रुग्णसंख्येने ६ हजाराचा टप्पा ओलांडला. त्यामुळे करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.