31 October 2020

News Flash

कोविड रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

वसई पूर्वेतील वसंत नगरी सिग्नलच्या जवळच्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला.

वसई करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.

लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसई करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. वसई पूर्वेतील वसंत नगरी सिग्नलच्या जवळच्या मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी घेऊन रुग्णवाहिका निघाली होती. वसई पूर्वेतील मुख्य रस्त्यावर वसंत नगरी सिग्नलजवळ पोहोचताच  रुग्णवाहिकेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही रुगवाहिका दुभाजकावर चढून पथदिव्यांच्या खांबाला ठोकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या घटनेनंतर वाहनचालकाने तातडीने दुसरी रुगवाहिका बोलावून रुग्णाला उपचारासाठी पाठविण्यात आले. वसईतील रुग्णवाहिका अपघाताची दुसरी घटना असून  याआधीसुद्धा पापडी येथे रुग्णवाहिकेला अपघात झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:06 am

Web Title: coronacirus pandemic covid patient ambulance accident dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 एक टन प्लास्टिक जप्त
2 ग्रामीण भागात आठ महिन्यांत १०१ जणांचा सर्पदंशाने मृत्यू
3 १६० नवे रुग्ण; २१८ करोनामुक्त
Just Now!
X