लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : फेब्रुवारी महिन्यात जानेवारीच्या तुलनेत करोना रुग्णांच्या रसंख्येत ४६ ने वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात (२८ पर्यंत) ५२४ रुग्ण होते तर फेब्रुवारी महिन्यात वाढ होऊन ५७० रुग्णांची नोंद झाली आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक मानली जात आहे. मृत्यूंची संख्या कमी झाली आहे हाच त्यातील दिलासा आहे.

डिसेंबर २०२० मध्ये वसई-विरार शहरात करोनाचे एक हजार ८१ रुग्ण आढळले होते तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या पन्नास टक्कय़ांनी घटली होती.  जानेवारी २०२१ महिन्यात केवळ ५८२ रुग्ण आढळले आणि ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात रुग्ण संख्या ४९९ ने घटली तर मृत्यू संख्या रुग्ण संख्या १५ ने कमी झाली होती. रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर नागरिकांनी तसेच पालिकेने सुटकेचा

फेब्रुवारीत करोनाच्या रुग्णसंख्यात ४६ ने वाढ निश्वास सोडला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. जानेवारी महिन्यात (२८ जानेवारी पर्यंत) ५२४ रुग्ण होते. तर फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेपर्यंत ५७० रुग्णांची नोंद झाली.

करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मागील महिन्यात  ५४५ रुग्ण करोना मुक्त झाले होते तर फेब्रुवारी महिन्यात केवळ ४२६ रुग्ण कमी झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनारुग्णांचा मृत्यू दर कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात ९ करोना रुग्ण दगावले होते तर फेब्रुवारी महिन्यात केवळ ५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१ मार्च पर्यंत शहरातील ३० हजार ३७८ जणांना करोनाची लागण झाली आहे तर ८९९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. २९ हजार ११६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर ३६३ जण सध्या उपचार घेत आहेत.