वसई : वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. बुधवारी शहरी भागात ३७ आणि ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या आता ९२१ झाली आहे, तर आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीत बुधवारी ३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात नालासोपारामधील १७, विरारमधील १५, नायगाव आणि वसईमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे वसई-विरार शहरातील एकूण संख्या ८७९ झाली आहे. बुधवारी सात रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या ३५५ झाली आहे. सध्या ४९४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात ३० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. ग्रामीण भागात रानगावजवळ तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागाची एकूण संख्या आता ४२ झाली आहे. त्यात सर्वाधिक २० रुग्ण अर्नाळा गावातील आहेत.

वसईतील करोनाबाधित

(महापालिका क्षेत्र)

एकूण रुग्ण-     ८७९

करोनामुक्त-     ३५५

मृत्यू-   ३०

उपचार सुरू-     ४९४