21 September 2020

News Flash

करोनाचा फटका सदनिका विक्रीला

सदनिकांची विक्री न झाल्याने नगररचना  विभागाचे अपेक्षित उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाईंदर : करोनोमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका मीरा भाईंदर शहरात तयार असलेल्या तब्बल ३ हजारहून अधिक सदनिकांना बसला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधारदेखील थंडावला आहे. सदनिकांची विक्री न झाल्याने नगररचना  विभागाचे अपेक्षित उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले आहे.

जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातदेखील टाळेबंदी नियम लागू करण्यात आला होता. वाढत्या किमतीमुळे आधीच ओस पडत असलेल्या नवीन बांधकाम क्षेत्राचे  टाळेबंदीमुळे कंबरडे मोडले गेले. यांचा फटका मीरा भाईंदर शहरातील विकासकांनादेखील बसला असल्याचे समोर आले आहे. सद्य परिस्थितीत मीरा भाईंदर शहरातील  एकूण ३ हजारांहूनही अधिक  सदनिका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत तर योग्य ग्राहक मिळत नसल्यामुळे  विकासक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्याचप्रमाणे सदनिकांची किंमत कमी केली की त्याचा लावलेल्या भांडवलावर परिणाम होण्याची भीती विकासकामध्ये निर्माण झाली आहे. पालिकेला कर विभाग आणि नगररचना विभागाकडून मोठय़ा प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असते. परंतु यंदा कर विभागाकडून २८ कोटी रुपयांची कर वसुली रखडली  आहे. तर आता नगररचना विभागाचेदेखील गेल्या ४ महिन्यांत १५ कोटींहून अधिक नुकसान झाले  आहे. त्याचप्रमाणे काम सुरू असलेल्या गृहनिर्माण संस्थेत मजुराचा अभाव असल्यामुळे त्यांच्या निर्मितीचा कालावधीदेखील वाढला आहे.

अपेक्षेपेक्षा केवळ ५० टक्केच उत्पन्नप्राप्ती

मीरा भाईंदर नगररचना विभागाला प्रति वर्षी सदनिकांच्या खरेदी- विक्रीच्या उलाढालीमुळे ९० ते १०० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. परंतु गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक व्यवहाराच ठप्प झाल्यामुळे उत्पन्न रखडले असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेला गेल्या चार महिन्यांत ३० कोटी रुपयेपर्यंतचे उत्पन्न अपेक्षित होते, परंतु  केवळ १५ कोटी रुपयेच उत्पन्न पालिका तिजोरीत जमा झाले आहे. त्यामुळे येत्या काळात महानगरपालिकेकडून योग्य पावले उचलून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागातील मुख्य अधिकारी दिलीप घेवारे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:10 am

Web Title: coronavirus huge impact on property sale and purchase transaction zws 70
Next Stories
1 पालिकेची वृक्षछाटणी अर्धवट
2 मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता
3 जिल्ह्याला जलदिलासा
Just Now!
X