25 October 2020

News Flash

मिरा भाईंदरमध्ये करोना बाधितांची संख्या ८

शनिवारी दोघांची पडली भर

प्रतिकात्मक छायाचित्र

मिरा भाईंदर शहरात शनिवारी दोन नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या आता 8 एवढी झाली आहे. यातील समोर आलेले दोन्ही रुग्ण घरगुती महिला असून यांचा कुठलाही प्रवास इतिहास नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच प्रकारे रुग्णाच्या घरातील नागरिकांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे.

मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भाईंदरच्या एस वी रोड परिसराती राहणारी 56 वर्षीय महिला व नारायण नगर येथे राहणाऱ्या 60 वर्षाच्या महिलेला करोनाची लागण झाली आहे. शनिवारी करण्यात आलेल्या तपासणी अहवालात या दोन्ही महिलांना करोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही महिला गृहिणी असल्याचे समोर आले आहे.एका महिलेला सेफी रुग्णालयात गेली असल्यामुळे तर दुसऱ्या महिलेला परिवारातील नागरिकांकडून लागण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबियांना अलगीकरणात कक्षात ठेवण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. सध्या हे दोन्ही रुग्ण कुणाच्या संपर्कात आले याचा तपास सुरु असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. त्याच प्रकारे मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 9:41 pm

Web Title: coronavirus mira bhayandar 9 patient nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 पालघरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोरोनाबधित मृताच्या संपर्कात आलेल्या २९ जणांचे नमुने निगेटिव्ह
2 वसईत करोना रुग्णाची संख्या १३, दिवसभरात चार नव्या रुग्णांची भर
3 कल्याण-डोंबिवलीत सापडले करोनाचे तीन नवे रुग्ण, सहा महिन्याच्या चिमुरड्याला लागण
Just Now!
X