News Flash

मुस्लीम व्यक्तीकडून सामान घेण्यास नकार, मीरा रोडमध्ये एकाला अटक

काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

कर्मचारी मुस्लीम असल्याचं कारण सांगत, सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या एका व्यक्तीला मीरा रोडमध्ये अटक करण्यात आलेली आहे. बरकत पटेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो मीरा रोडमधील स्थानिक दुकानात सामान घरपोच पोहचवण्याचं काम करतो. सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचं नाव गजानन चतुर्वेदी असं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी बरकत पटेलला ९ ठिकाणी सामान पोहचवायचं होतं. जया पार्क परिसरात राहणाऱ्या सुप्रिया चतुर्वेदी यांच्याकडे सकाळी ९ वाजून ४० मिनीटांच्या दरम्यान सामान पोहचवण्यासाठी गेला होता. नियमांप्रमाणे बरकत सोसायटीच्या गेटबाहेर चतुर्वेदी यांना सामान देत होता, इतक्यातच सुप्रिया यांचे वडील गजानन यांनी आपल्या मुलीला सामान घेण्यापासून थांबवलं. बरकतने या प्रकरणाचा व्हिडीओ पोलिसांना दिला आहे.

या व्हिडीओनुसार आरोपीने सर्वात प्रथम बरकतला त्याचं नाव विचारलं. सुप्रिया या सामान स्वीकारण्यास तयार होत्या, तरीही गजानन यांनी आम्ही मुस्लीम व्यक्तीकडून सामान स्वीकारणार नाही असं सांगितलं. “मी त्या क्षणी काहीही बोललो नाही, घडलेला प्रकार मी मोबाईलमध्ये शूट केला आणि पोलिसांना सोपवला, पण माझ्यासाठी हा प्रसंग अपमानास्पद होता.” बरकतने आपली बाजू मांडली. मी आतापर्यंत ज्या-ज्या घरांमध्ये गेलो आहे लोकांनी मला आपुलकी दाखवली आहे. सध्याच्या खडतर काळात आम्ही बाहेर का पडतोय याची अनेकांना जाणीव आहे, मात्र असे प्रकार त्रासदायक असतात, असं बरकत पटेलने म्हटलं आहे. मंगळवारी संध्याकाळी बरकतने काशीमीरा पोलिस ठाण्यात गजानन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गजानन यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 2:11 pm

Web Title: coronavirus mumbai man refuses to take grocery from muslim delivery boy arrested psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ग्रामीण भागातील महिला बचत गटही निराधार
2 Coronavirus : मीरा-भाईंदरमध्ये एकाच दिवशी ८ नव्या रुग्णांची भर
3 सर पेटिट रुग्णालय पुन्हा सुरू होणार