News Flash

तीन विशेष पथके ; ठाणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष

ठाणे जिल्ह्य़ात करोना विषाणूचा फैलाव झाला असून ठाणे शहरात करोना विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्षाची पाहणी केली.

ठाणे : करोना विषाणू प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्य़ात करोना विषाणूचा फैलाव झाला असून ठाणे शहरात करोना विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यंत्रणा आता सज्ज झाली आहे. त्यानुसार करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याचे दृष्टिने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत  विनोद इंगळे, महेश रावळ हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत गुणवंत झांबरे, फारुख शेख यांची उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत दशरथ वाघमारे, मकरंद काळे यांची तर उपायुक्त मनीष जोशी यांच्या समन्वयांतर्गत देवेंद्र नेर, गजानन गोदापुरे हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त वर्षां दीक्षित यांच्या समन्वयांतर्गत विनोद पवार, राम जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मनेष वाघिरकर यांच्या समन्वयांतर्गत सदाशिव माने, दिनेश तायडे यांची नेमणूक तसेच सहाय्यक संचालक श्रीकांत देशमुख यांच्या समन्वयांतर्गत रामदास शिंदे, राजेश कंकाळ, तर उपायुक्त सचिन गिरी यांच्या समन्वयांतर्गत प्रदीप मकेश्वर, रविंद्र कासार हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखालील दुसऱ्या पथकात उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील, दयानंद गुंडप यांची तसेच उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत  शैलेंद्र बेंडाळे, विकास ढोले असणार आहे. उपायुक्त मनिष जोशी यांच्या समन्वयांतर्गत नितीन येसुगडे, विजय रोकडे तर उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील, विलास ढोले हे कार्यरत असणार आहेत.

जिल्ह्य़ात १३६ विलगीकरण कक्ष ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भेट

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ात १३६ विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्षाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्यभरात करोना विषाणूचा फैलाव झाला असता ठाणे जिल्ह्य़ातही करोना विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील करोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून १३६ विलगीकरण कक्ष तयार केले आल्याचे शिंदे यांनी सांगितले.  या वेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयातही कक्ष

शहापूर : भिवंडीचे प्रांतअधिकारी मोहन नळदकर यांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. संशयित रुग्णांसाठी एक आणि बाधित रुग्णांसाठी एक असे प्रत्येकी दोन खाटा असलेले कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत.  या कक्षात अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत.तसेच इतर साधनसामग्री ठेवण्यात आली आहे.

४० खाटांचे स्वतंत्र कक्ष करोनाच्या पार्श्वभूमीवर

ठाण्यातील श्रीनगर येथे २५ खाटांचे तसेच रोझा गार्डनिया येथे १५ खाटांचे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. तर यापूर्वीच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे आठ खाटा आणि खाजगी रुग्णालयांमध्ये १२ खाटांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.  महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.

 

ल्ल महापालिकेच्या पुढाकाराने ज्युपिटर रुग्णालयात दोन, मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात दोन, वेदांत रुग्णालय येथे पाच, कौशल्य रुग्णालयात दोन आणि बेथनी रुग्णालय येथे दोन  खाटांचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.

ल्ल शीघ्रकृती पथक गठीत केले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात २४ तास एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

गोदरेजकडून एक लाख ‘हॅण्डवॉश’

ठाणे : ‘करोना’ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी साबणाने किंवा हात धुलाई द्रव्याने हात धुण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणाकडून केले जात असून या पार्श्वभूमीवर गोदरेज कंपनीच्या प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंटने सोमवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एक लाख हात धुलाई द्रव्याचे पिशव्या दिल्या. या कार्यक्रमादरम्यान, करोनापासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात एकमेकांशी हस्तांदोलनाऐवजी पारंपरिक पद्धतीने हात जोडून नमस्कार करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी या वेळी केले.

‘करोना’ या विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात असून त्याचबरोबर शहरात स्वच्छता राखण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी गोदरेज कंपनीच्या प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंटने एक लाख हात धुलाई द्रव्य पिशव्या महापालिकेकडे सुपूर्द केल्या असून त्याचे सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात महापौर नरेश म्हस्के यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांना वाटप केले. त्या वेळेस सभागृहनेते अशोक वैती, नगरसेवक उमेश पाटील, सुधीर कोकाटे, नगरसेविका अनिता गौरी, उपायुक्त संदीप माळवी, गोदरेज मूव्हमेंट इंडिया सार्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया, गोदरेज ग्रुपच्या ब्रॅड कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष सुजीत पाटील हे उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनीही हात धुलाई द्रव्य किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे, असे गोदरेजचे सुनील कटारिया यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 4:18 am

Web Title: coronavirus outbreak disaster management cell in thane municipal corporation zws 70
Next Stories
1 अंदाजपत्रकात जुन्याच घोषणा, योजना
2 नित्यनूतनाचे शिलेदार : स्वदेशी तंत्रज्ञानाने परदेशी मक्तेदारी मोडणारा उद्योजक
3 ‘करोना’चा वसईकरांच्या जनजीवनावर परिणाम
Just Now!
X