News Flash

बाजार थंडावले; एसटीलाही फटका

वसई-विरारमध्ये रस्त्यांवरील बेकायदा फेरीवालेही गायब

वसई-विरारमध्ये रस्त्यांवरील बेकायदा फेरीवालेही गायब

वसई : ‘करोना विषाणू’ने सध्या देशासह विविध राज्यात थैमान घातले आहे.याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पालिकेकडून विविध ठिकाणचे बाजार बंद करण्यात आले आहेत. यात नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण करणारे बेकायदा फेरीवाले हटविण्यात आल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वसई-विरार शहरात विविध ठिकाणी फेरीवाल्यांची अतिक्रमण  करून बाजार  सुरू केले आहेत. हे बाजार नागरिक ये-जा करीत असलेल्या मुख्य मार्गतच असल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना समोरे जावे लागत होते.  मात्र, काही दिवसांपासून करोनाचे सावट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणी होणारी गर्दी टाळली जात आहे. नालासोपारा , विरार,  वसई  नायगाव,  अशा विविध ठिकाणच्या भागात बाजार भरतात. ते सध्या बंद आहेत. त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत.

एसटीच्या प्रवाशांची संख्या जवळपास ३० टक्कय़ांनी कमी झाली आहे. वसईच्या नवघर,वसई अगरातून दररोज पुणे व इतर लांबपल्ल्याच्या ठिकाणी बसेस  सोडल्या जातात. रोज पुण्याच्या दिशेचे वसई आगारातून दररोज तीन गाडय़ा सोडल्या जातात मागील दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या २५ ते ३० टक्कय़ांनी  कमी झाल्याने या मार्गावर आता फक्त दोनच गाडय़ा सुरू ठेवण्यात आल्या असल्याची माहीती एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे  प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व करोना या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी एसटीने डेटॉल व जंतुनाशक याचा वापर करून गाडय़ा स्वच्छ करण्यात आल्या आहेत तर प्रवाशांना व वाहक यांच्यासाठी सॅनीटायजर उपलब्ध करून देण्यात आली आहे जेवढय़ा उपाययोजना करणे शक्य आहे तेवढी उपाययोजना केल्याची माहिती वसई एसटी आगाराचे प्रमुख दिलीप भोसले यांनी सांगितले आहे.

लग्नसराईला फटका

सध्या शाळेच्या परीक्षा संपल्यावर लग्नसराईच्या कार्यRमाला सुरवात होते. पण सध्या करोना विषाणूचा हाहाकार पाहता लग्नसराईच्या कार्यRमांना पूर्ण विराम लागला आहे. अनेक लग्नसोहळे पार पडणारे हॉल, फार्म हाऊस, हॉटेल बुकिंग पासून परावृत्त आहेत. ज्या ठिकाणी आरक्षण झाले आहे, त्याठिकाणी बहुतांश सोहळे रद्द करणायत आले वा काही ठराविक पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडत आहेत. सध्या लग्नाचे मुहूर्त नसल्याने विवाह सोहळे कमी आहेत. पण वाढदिवस, बारसे, साखरपुडे, समारोप उत्सव, पार्टी यासारखे सोहळे रद्द होत आहेत वा पुढे ढकलले जात आहेत. याचा फटका या व्यावसायीकांना मोठय़ा प्रमाणावर बसत आहेत.

डॉक्टरच्या फलकबाजीमुळे संभ्रम

विरार : वसईतील एका डॉक्टराने करोना पासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे असल्याची जाहिरातबाजी केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबतत पोलिसांनी डॉक्टरची चौकशी करून जिल्हा आरमेग्य अधिकार्म्यांकडे कारवाई करता येईल का याबाबत विचारणा केली आहे. डॉक्टराने मात्र रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विनामूल्य आयुर्वेदाची औषधे देत असल्याचा दावा केला आहे. वसईच्या पूर्वेच्या गोखीवरे परिसरात सरवार खान या आयुर्वेदिक डॉक्टराचे क्लिनिक आहे. त्याने करोनो विषाणूपासून बचावासाठी औषध उपलब्ध असल्याचे जाहिरात फलक लावले आहेत. करोनावर औषध उपलब्ध नसताना डॉ.खान याने करोनावरील औषधाची जाहिरात केल्याचा संभ्रम लोकामध्ये निर्माण झाला आणि स्थानिक नागरिकांनी वालीव पोलीस ठाण्यात तRार दाखल केली. पोलिसांनी डॉ खान याची चौकशी केली. त्यावेळी करोनावर नाही तर करोना होऊ नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती  वाढविण्यासााठी प्रतिबंधात्मक औषधे विनामूल्य देत असल्याचे त्याने सांगितले. मात्र अशी जाहिरात करम्णे वैद्य्कीय नियमात बसते का ते तपासण्यासाठी आम्ही महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाला पत्र दिले असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:38 am

Web Title: coronavirus outbreak illegal hawkers also disappear from road in vasai virar zws 70
Next Stories
1 पत्नीची हत्याकरुन आत्महत्या केल्याचा बनाव
2 करोनामुळे देश-विदेशातील सहली स्थगित
3 एक हजार ६३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर
Just Now!
X