05 June 2020

News Flash

Coronavirus lockdown : भाजीमंडई तिसऱ्यांदा स्थलांतरित

ठाण्यातील जांभळीनाका परिसरात शहरातील सर्वात मोठी भाजीमंडई आहे.

जांभळीनाका भाजीमंडईचे चार भागांत विभाजन; गर्दी टाळण्यासाठी पालिकेचा नवा पर्याय

ठाणे : येथील जांभळीनाका भागातील भाजीमंडईत भाजीपाला खरेदीसाठी होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे करोनाच्या संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून महापालिका प्रशासनाने गेल्या आठ दिवसांत भाजी मंडईची जागा दोनदा बदलली. मात्र, तरीही भाजीमंडईतील गर्दी कमी होत नसल्यामुळे प्रशासनाने आता तिसरा पयार्य पुढे आणला असून त्यानुसार भाजीमंडईचे चार भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील चार ठिकाणी आता ही भाजीमंडई सुरू करण्यात येणार असून या विभाजनामुळे भाजीमंडईतील गर्दी कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाण्यातील जांभळीनाका परिसरात शहरातील सर्वात मोठी भाजीमंडई आहे. शहरातील अनेक किरकोळ विक्रेते येथूनच भाजी घेऊन त्याची परिसरात विक्री करतात. तसेच स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने नागरिकही याठिकाणी खरेदीसाठी मोठय़ा संख्येने येतात. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत ही मंडई सुरू असते. या मंडईत भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे मंडईत होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत होते. तरीही येथील गर्दी कमी होत नव्हती. अखेर करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सेंट्रल मैदान ही मंडई स्थलांतरित केली. मोठे मैदान असल्यामुळे गर्दी कमी होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ती फोल ठरली. याठिकाणीही नागरिकांची गर्दी कायम होती. त्यामुळे ही मंडई सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौक या तीन रस्त्यांवर स्थलांतरीत करण्यात आली. हे तिन्ही रस्ते प्रशस्त असल्यामुळे तसेच सध्या वाहतूक बंद असल्यामुळे याठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, असा पालिकेचा अंदाज होता. मात्र, याठिकाणीही नागरिकांची भाजी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता तिसरा पयार्य पुढे आणला असून त्यानुसार भाजीमंडईचे चार भागात विभाजन करण्यात येणार आहे.

चार ठिकाणी मंडई

या भाजीमंडईत २५० व्यापारी भाजीपाला विक्री करत असून त्यांचे चार भागांत विभाजन करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील रेमंड कंपनीसमोरील पोखरण एकचा रस्ता, बाळकुममधील हायलँडचे मैदान, घोडबंदरमधील बोरिवडे आणि कळव्यातील पारसिकनगर या चार ठिकाणी ही मंडई स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पालिकेने  दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 2:05 am

Web Title: coronavirus outbreak jambli naka vegetable market divided into four parts zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : ठाणे शहरातील २६ परिसर देखरेखीखाली
2 Coronavirus : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
3 coronavirus : ठाण्यात दोन जण करोनामुक्त
Just Now!
X